फळे काढणीस आल्यानंतर किव्वा फळांमध्ये गोडी उतरायला चालू झाल्यानंतर फळमाशी फळामध्ये अंडी घालते, त्यामूळे त्यामध्ये त्यात अळी दिसते.
फळमाशीचे जीवनचक्र :-
१) प्रौढ नरमाशी व मादीमाशी यांचे मिलन होते.
२) मादीमाशी मिलन झाल्यानंतर ५ ते १० दिवसात फळामध्ये अंडी घालतात.
३) अंडी घातल्यानंतर त्याचे ३ ते १० दिवसामध्ये त्यात अळी तयार होते.
४) त्यानंतर 10 ते 25 दिवसानंतर अळीचे कोषामध्ये रूपांतर होते.
५) त्यानंतर ८ ते ४० दिवसानंतर कोष माशीमध्ये रूपांतरित होतात.
६) याप्रमाणे फळमाशी चे जीवनक्रम चालते.
उपाययोना :-
१) फळधारणा चालू झाल्यानंतर बागेमध्ये एकरी चार ते सहा फळमाशी (कामगंध) सापळे लावावेत.
२) फळमाशी ट्रॅप मध्ये नरमाशी आकर्षित होऊन त्यामध्ये गोळा होतात, यामुळे नर-मादी मिलन न झाल्याने प्रजनन होत नाही आणि फळमाशी नियंत्रण चांगल्याप्रकारे होते.
३) ट्रॅप चा वापर इंडिकेटर म्हणुन सुद्धा होतो, जास्त प्रमाणात फळमाशी गोळा झाल्यास प्रादुर्भाव अधिक आहे असे समजते व फळमाशी नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटकनाशके फवारणी करावी.
४) कीटकनाशक फवारणी केल्यास १५ दिवसात फळमाशीवर नियंत्रण मिळते.
५) बागेतली पाहिले फळ काढणीस तयार होण्याच्या पंधरा दिवस आधी शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे.
६) नुवान (डायक्लोरोव्हास) हे २ मिली प्रती लिटर पाण्यात याप्रमाणे फवारावे.
( नुवान बंद झाले असून त्याला पर्याय म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध असलेले त्याचसारखे कीटकनाशक फावारावे.)
७) आठं दिवसानंतर क्लोरोपायरीफॉस ५०% हे २ मिली. प्रती लिटर पाण्यात याप्रमाणे फवारावे.
८) पंधरा दिवसानंतर बागेतील फळमाशी नियंत्रणात येते व एकही फळ खराब अळी निघणार नाही.
९) फळे संपेपर्यंत दोन्हीपैकी एक औषधे दर आठ दिवसांनी आलटून पालटून फवारावे.
Share your comments