1. कृषीपीडिया

हुमणीग्रस्त ते हुमणीमुक्तीचा प्रवास: प्रिव्हेंटिव्ह थेअरी

साल २०१५-१६. ह्यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेने हुमणी अळीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात जाणवला.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हुमणीग्रस्त ते हुमणीमुक्तीचा प्रवास: प्रिव्हेंटिव्ह थेअरी

हुमणीग्रस्त ते हुमणीमुक्तीचा प्रवास: प्रिव्हेंटिव्ह थेअरी

साल २०१५-१६. ह्यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेने हुमणी अळीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात जाणवला. मागील वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव खूप कमी होता. पण ह्या वर्षी हुमणी अळीमुळे पिकाचे भरपूर नुकसान झाले. दोन एकर उसापैकी जवळपास अर्धा ऊस हुमणी बाधित झाला. उसाची मुळी तुटल्यामुळे उसाचा बेटाला धक्का जरी लागला तरी ऊस तुटून हातात यायचा. त्याकाळी आमचा शेती मध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. आता पर्यंत एकरी दहा हजार खर्च झाले होते आणि औषधांचा परिणाम,नगण्य. शेतकऱ्यांमध्ये एक गोड गैरसमज असतो की जितके महाग औषध तितके चांगले परिणाम. वयक्तिक मी असा कधीही समज करून घेत नाही पण , चला करून बघूया. अडीच हजार रुपयास दहा ग्राम औषध. हे दहा ग्राम औषध एक एकरास पुरेसा आहे. कंपनीचा माणसाचे बडे बडे बाता ऐकून हे नक्की थोतांड आहे हे लक्षात आलं होतं. आणि ते थोतांडच होतं. ह्याही औषधाचा गुण नाही. 

                  शेतकऱ्यांचा आयुष्यात सगळ्यात वेदनादायी गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभ्या पिकाची नासाडी होताना बघणे. ह्या आळीला थांबवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले असताना आम्ही जैविक उपायांवर लक्ष केंद्रित केले. आम्ही बिव्हेरिया मेंटरहीजम ह्या बुरशींचा वापर केला. पहिल्याच प्रयत्नात यश आले. बिव्हेरिया मेंटरहीजमचा वापरा मुळे पांढऱ्या शुभ्र आळीचे रूपांतर मृत हिरवट काळपट आळी मध्ये झाले. बघता बघता हुमणीचा नायनाट झाला.

त्यावर्षापासून आम्ही आमचा शेती मध्ये ह्या बुरशींचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. हुमणी किडीचा जीवन चक्र एक वर्षाचे असते. जानेवारी महिन्यात हुमणी आळी कोष अवस्थेत असते. ह्या दिवसात आळी कडून पिकाला कोणतेही नुकसान होत नाही. आम्ही जानेवारी महिन्यापासून महिन्यातून दोनदा प्रत्येक क्षेत्रावर बिव्हेरिया मेंटरहीजम ह्या बुरशींचा वापर नियमित करत असतो. त्यामुळे ह्या बुरशींचा संख्या जमिनीमध्ये खुप मोठ्या प्रमाणात वाढते. वेळेचा आधी ह्या बुरशींचा वापर केल्यामुळे आळीचे सुप्तावस्थेतच नियंत्रण होते. आम्ही ह्या बुरशींचा वापर मृगाचा पावसा पर्यंत करत असतो. मृगाचा पाऊस पडला की आम्ही ह्या बुरशींचा वापर थांबवतो. जसे अंतराळयानास फक्त पृथ्वीची गुरुत्वाकर्षणशक्ती वर मात करूस्तोवर शक्तीचा वापर करावा लागतो अगदी तसाच कीड सुप्तावस्थेत असुस्तोवर ह्या बुरशींचा वापर करावा लागतो. तिथून पुढे हुमणीवर नियंत्रण मिळवणे खुप सोपे जाते. मृगाचा पाऊस पडताच हुमणी आपल्या सुप्तावस्थेतुन बाहेर पडते व कालांतराने त्यांचा मिलनातून अंडी घातली जातात. 

ह्याच अंड्यांवर किंवा त्यातून जन्मणार्या सुक्ष्म आळींवर बिव्हेरिया मेंटरहीजमचा हल्ला चढतो आणि आपले शिवार हुमणीमुक्त होते.

                      पण हुमणी जानेवारी महिन्यात सुप्तावस्थेत असते तर त्यावेळी ह्या जिवाणूंचा वापर का करावा? मित्रानो आपल्या शेती मध्ये रोज एक नवीन संकट आपल्यासमोर उभे राहते. आपण प्रत्येक संकट समोर आल्यास त्याचे करायचा त्या उपाययोजना करत राहतो. त्यामुळे ऐनवेळी करण्याचा गोष्टींमधून आपल्याला त्या संकटावर मात करता येईल ह्याची शतप्रतिशत हामी कोणालाही देता येत नाही. आणि अशा संकटाचा घडीला करण्यात येणाऱ्या उपाययोजना ह्या नेहमी खर्चिक असतात. जसे हृदयाचे बायपास शस्त्रक्रिया करणे महाग असते आणि त्यातून माणूस जगेल ह्याचीही शाश्वती नसते. पण त्याच व्यक्तीने पूर्वीपासून व्यायाम केला असता,त्याचे आहार चांगले असते तर त्याला हृदय विकार होणारच नाहीत आणि जरी झाले तरी त्याला थोड्याशा औषध गोळ्यांनी थांबवता येते.

शेतकऱ्यांनी कीड रोगाचा दोन पाऊल पुढे असावे. मी जर शेतामध्ये एखादे पीक घेणार असू तर त्या पिकाचा जीवनचक्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाची माहिती आपल्याला हवी. कीड किंवा रोग सक्रिय होण्याचा बरच आधी त्यावर उपाययोजना करावेत. त्यामुळे आपण कीड किंवा रोगाचा दोन पाऊल पुढे असतो. कीड रोगाचे सुप्तावस्थेतच नियंत्रण होते. त्यातून थोडा प्रादुर्भाव झाला तरी त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते आणि ह्या सर्व नियोजनामध्ये खूप कमी पैसे खर्च होतात. आयुष्यभर व्यायाम करण्यास जास्ती खर्च होत नसतो पण हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी कदाचित शेतीही विकावी लागते आणि त्यातून सुखरूप परत येण्याचीही शास्वती नसते. वेळेचा आधी काम करते वेळेस आपले शंभर चुका झाल्या तरीही माफ असतात आणि संकटाचा घडीला छोटीशी चुकही अमान्य असते. प्रत्येक कीड व रोग सक्रिय होण्याआधी काम करणे ह्यालाच प्रिव्हेन्शन थियरी म्हणतात.

 

English Summary: The journey from humiliation to humiliation: Preventive Theory Published on: 26 February 2022, 07:07 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters