शेतीमध्ये दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत शेतकरी बांधव आता आधुनिकतेची कास धरून शेती करू लागले आहेत. आता पारंपरिक पिकाला फाटा दिला जाऊ लागला आहे. आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कॅश क्रॉप अर्थात नगदी पिकांची लागवड करू लागले आहेत.
शेतकरी बांधवांनी स्वीकारलेला हा बदल निश्चितच त्यांच्या फायद्याचा आहे. कृषी तज्ञांच्या मते, शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत नगदी पिकांची तसेच कायम मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करणे अपरिहार्य बनत चालले आहे. आज आपण नेहमीच मागणी मध्ये असलेल्या तेज पत्ता अर्थात तमालपत्र या मसाला पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
बाजारात तमालपत्राला मोठी मागणी असते, तमालपत्र एक प्रमुख मसाला पदार्थ असल्याने याची बारामाही मागणी असते म्हणून याची शेती निश्चितच एक फायद्याचा सौदा ठरू शकते. तमालपत्र शेती विषयी सर्वात महत्वाची आणि फायद्याची बाब म्हणजे याच्या शेतीसाठी जास्त खर्च करावा लागत नाही. याची शेती करणे तुलनेने सोपे असून अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
तमालपत्राच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते. आता यातून मिळणार्या उत्पन्नाबद्दल बोलायच झालं तर एका तमालपत्राच्या रोपातून वर्षाला सुमारे 3000 ते 5000 रुपये मिळू शकतात. अशा पद्धतीने 25 झाडांपासून वर्षाला 75,000 ते 1,25,000 रुपये कमावता येतात. तमालपत्रची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते. भारत, रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स, उत्तर अमेरिका बेल्जियम यांसारख्या अनेक देशात तमालपत्र ची शेती केली जाते.
शेतकरी मित्रांनो जर आपणास या पिकाची लागवड करायची असेल तर आपण 5 बिघा शेतजमिनीत तमालपत्राची शेती करू शकता. ही शेती करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत करावी लागेल. जसजसे रोप वाढत जाईल तसतसे तुम्हाला कमी मेहनत घ्यावी लागेल. जेव्हा तमालपत्र झाडाचा आकार घेते तेव्हाच आपल्याला झाडाची काळजी घ्यावी लागते. याच्या शेतीतून आपण दरवर्षी चांगले उत्पन्न मिळू शकतात.
महत्वाच्या बातम्या:-
बातमी कामाची! सरकारचा एक निर्णय आणि लाखो शेतकऱ्यांचा फायदा, जाणून घ्या 'या' योजनेबद्दल
भावा फक्त तूच रे……! कमी खर्चात कलिंगड आणि मिरचीचे उत्पादन घेऊन 'हा' शेतकरी बनला मालामाल
Share your comments