1. कृषीपीडिया

Crop Veriety: शेतकरी बंधूंनो! गवारच्या 'हे'तीन वाण म्हणजे भरपूर उत्पन्नाचे आहे समीकरण,वाचा माहिती

गवार हेदेखील एक महत्त्वाचे भाजीपाला वर्गीय पीक असून सरासरी 18 ते 30 अंशाच्या दरम्यान असलेले तापमान यासाठी उत्तम असते. गवारची लागवड खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात केली जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील विचार केला तर गवारीच्या शेंगामध्ये खूप प्रमाणात जीवनसत्वे आणि फॉस्फरस, लोहा सारख्या घटकांचे प्रमाण असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
clustor beans crop

clustor beans crop

 गवार हेदेखील एक महत्त्वाचे भाजीपाला वर्गीय पीक असून सरासरी 18 ते 30 अंशाच्या दरम्यान असलेले तापमान यासाठी उत्तम असते. गवारची लागवड खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात केली जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील विचार केला तर गवारीच्या शेंगामध्ये  खूप प्रमाणात जीवनसत्वे आणि फॉस्फरस, लोहा सारख्या घटकांचे प्रमाण असते.

 गवार लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगला आर्थिक नफा मिळण्याची शक्यता असते. कारण आपण गवारीच्या बाजारभावाचा विचार केला तर वर्षभर चांगल्यापैकी बाजार भाव टिकून असतो. या लेखात आपण गवारीच्या 3 महत्वाच्या वाणाबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Leafy Vegetable Farming: उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असेल तर 'या' पालेभाज्यांची लागवड देईल कमी खर्चात चांगला नफा

 गवारचे महत्वाचे तीन वाण

1- सुरती गवार- या जातीच्या झाडास फांद्या अधिक असतात व आक्टोबर नंतर व उन्हाळ्यामध्ये लागवड करता येणारे वाण असून चांगल्या प्रकारे मागणी असलेले हे वाण आहे. याच्या शेंगा जास्त पातळ, लांब, जाडसर व आकाराने थोडा मोठे असून चव थोडी गुळचट असते. या वाणाला शेंगांच्या गुच्छ लागत नाही.

नक्की वाचा:Polyhouse Care Tips: 'पॉलिहाऊस फार्मिंग' मध्ये 'या' गोष्टींची काळजी म्हणजे हमखास नफा मिळण्याची हमी

2- नंदिनी( एनएसबी 12)- ही एक संकरित जात असून निर्मल सीड्स कंपनीचे हे वाण आहे. याच्या शेंगा आखूड व कोवळ्या व मऊ असतात. या वाणाच्या शेंगा ची चव उत्तम असल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी असते.या वाणाची झाडे लहान असतात व पानाच्या मध्ये गुच्छात भरपूर शेंगा लागतात. ही जात रोग प्रतिकारक्षम असल्यामुळे व्यापारी तत्त्वावर लागवडीसाठी खूप फायद्याचे ठरते.

3- पुसा सदाबहार- हे सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. या जातीच्या शेंगा लांब असतात व हिरव्या रंगाच्या असतात. या जातीची लागवड केल्यापासून काढणी ही 45 ते 55 दिवसांनी सुरू होते.

नक्की वाचा:Zucchini Cultivation: 'या' कारणामुळे झुकिनीला आहे बाजारपेठेत चांगली मागणी आणि मिळतो शेतकऱ्यांना चांगला नफा

English Summary: the good productive variety of cluster beans crop Published on: 16 August 2022, 03:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters