कृषि क्षेत्र हा भारतातील सर्वात मोठा मुक्त खाजगी क्षेत्र व सर्वात मोठे असंघटित क्षेत्र आहे, दुर्दैवाची बाब अशी की या देशात हमाल संघटित होऊन आपल्या मेहनतीचे मूल्य ठरवू शकतात परंतू शेतकरी नाही, भारतातील अन्नधान्य क्षेत्रफळ 97.32 दशलक्ष हेक्टर इतके असून जगात शेती उत्पादन निर्यातक 15 देशात मोडतो, जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या या देशात शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे, लबाड व्यापाऱ्यांच्या संगतीने स्वार्थी राजकारण्यांनी शेतकरी विरुद्ध शेतकरी अशी परस्थिती निर्माण करुन ठेवली आहे फोडा आणि राज्य करा धोरणाचा वापर करून बळीराजाला गाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याला कारणीभूत शेतकरी पण तितकाच आहे, नऊ ते दहा महिन्यांपासून कृषी विषयक तीन अध्यादेश रद्द करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला असुन सरकार ने आपदा मे सुविधा निर्माण करीत आंदोलनकर्त्यांना देशद्रोही, खलिस्तानी, आंदोलनं जीवी चे प्रमाणपत्र देऊन टाकले तर सरकारच्या अध्यादेश समर्थन करणाऱ्या काही शेतकरी संघटनांना देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊन दोघांमध्ये वैचारिक विष कालवून शेतकरी विरुद्ध शेतकरी अशी कायमची दरी निर्माण केली, स्वातंत्र्य काळापासून असंघटित ठेवून शेतकऱ्यांचा वापर करण्याची नीच वृत्तीत बदल घडविण्याच्या कोणत्याच राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला नाही. शेतकरी आंदोलनाला शेतकऱ्यांचा विरोध म्हणजे पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखे.
कालचा भारत बंद हा शेतकरी बांधवात कायमची फूट पाडून गेला भविष्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनं करतांना आंदोलनं चिरडण्यासाठी शेतकरीपुत्र जे राजकारण्यांच्या गुलामीत आंधळे झाले समोर आले तर नवल वाटू देऊ नका.
कधी काळी परदेशातील प्रताडित लोकांबद्दल संवेदना ठेवणारे आज भारतातील लखीमपुर घटनेतील मृत्यू बद्दल प्रांत वाद करीत आहेत, यूपी मधील लखीमपुर खिरी जिल्ह्यातील घटना केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या स्वागत समारंभ व ईतर कार्यक्रम त्यांच्या जिल्ह्यात ठेवण्यात आले होते या अगोदर च्या एका कार्यक्रमात अजय मिश्रा उर्फ टेनी भय्या यांनी शेतकरी आंदोलकांना गर्भित इशारा पण दिला होता 3ऑक्टोंबर रोजी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत गाडी खाली चिरडून चार शेतकरी एक पत्रकार अन्य घटनेत तीन असे आठ व्यक्तींचा मृत्यू झाला तर दहा ते बारा बारा शेतकरी जखमी झाले, घडलेली घटनेत आरोपी कोण का घडलं गुन्हेगारांना दंडित करण्यात यावे मृतकांना अर्थिक मदत मिळावी ही प्रत्येकाची ईच्छा आहेच व घडलेल्या घटनेचा निषेध म्हणुन एक दिवस बंद ला प्रतिसाद देणे काय वाईट.? काश्मीर पासुन अफगाणिस्थान पर्यंत वाईट घटनांचा आपण निषेध नोंदवतो कंगना राणावत, सुशांत सिंह बद्दल , अर्णब गोस्वामी अश्या कित्तेक घटनेत आपण सहानुभूती दाखवतो व न्यायाची मागणी करतो, मग शेतकरी हत्येवरच प्रांत वाद का.??
महाराष्ट्रतील अतिवृष्टी ने झालेले नुकसान भरून न निघणारे आहे, आता जर कर्ज माफी, वीज बिल माफ, वीज दर कमी करा, अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या, सोयाबिन ला भाव द्या या मुद्द्यावर विखुरलेल्या संघटना व सरकार चा विरोध दाखवणारे पक्ष जर आंदोलनं करतील तेंव्हा शेतकरी एक जुटिने रस्त्यावर उतरेल अशी अपेक्षा ठेवू नये.
कारण आता शेतकरी हा प्रांत वाद, वेग वेगळ्या संघटना पक्षात विखुरला असुन सोशल मीडिया द्वारे द्वेषाचे विष कालवण्यात कोणतीच कसर सोडली नाही.
पूर्वीपासून असंघटित असलेला शेतकरी वर्ग संघटित होण्याचा मार्ग धूसर.
लेखक - पत्रकार, मुख्तार शेख
Share your comments