येणारा हंगाम फार कठीण राहील असे वाटते. जागतीक मंदी किमान दोन वर्षे चालेल. या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंनाच मागणी राहील. कारण जनते जवळ पोट भरण्यापूरताच पैसा येत राहील. चैनीच्या वस्तू स्वतःत मिळेलही पण घेण्याची हिम्मत कोणी करणार नाही. मोटारकार उद्योग ठप्प होतील. तीन शिफ्ट चे उत्पादन एका शिफ्ट मध्ये चालेल. म्हणजे रोजगारी कमी होईल. प्राॅडकशन जास्त विक्री कमी. पगार वाढ होणारच नाही. उलट पगार सुध्दा उशीरा होतील. नोकर भरती बंद राहील. तर दुसर्या बाजूला सुशिक्षित बेकारांची फौज वाढत जाईल. वाहतुक व्यवस्था कोलमडेल. याक्षेत्रावर अवलंबून असणार्यांचा प्रश्न निर्माण होईल. पर्यटन क्षेत्र, हॉटेल, लॉजिंग व त्यावर आधारित सर्व यंत्रणेला सर्वात मोठा फटका बसेल. कोल्ड्रिंक व्यवसाय कोलमडेल. एकंदरीत चैनीच्या व्यवसायाल फार मोठा फटका बसेल.
व त्यावर आधारित सर्व यंत्रणेला सर्वात मोठा फटका बसेल. कोल्ड्रिंक व्यवसाय कोलमडेल. एकंदरीत चैनीच्या व्यवसायाल फार मोठा फटका बसेल. सर्वत्र कपातीचे धोरण राहील. काही क्षेत्रात उत्पादन कमी व उत्पादन खर्च वाढतील. पर्यायाने काही वस्तूंच्या किंमती सुध्दा वाढतील. जर असे झाले तर याचा फटका शेती क्षेत्राला सुध्दा बसेलच. म्हणून माझ्या सर्व शेतकरी मित्रांनी येणार्या परीस्थितीचा विचार करून येत्या हंगामाचे नियोजन करावे. उत्पादन खर्च कमी कसा येईल याचा विचार करावा. शेतीसाठी लागणार्या खर्चाची तजवीज करून ठेवावी. बियाण्याचा तुटवडा निश्चितच जाणवेल. रासायनिक खताच्या सबसिडी मध्ये केन्द सरकार कपात करण्याचे धोरण राहणार असल्याने काहीप्रमाणात NPK खते महागतील.
शेतमजूरांच्या दैनंदिन गरजा वाढल्याने मजूरीचे दर सुध्दा वाढवून मागतील. एकंदरीत शेतीचा उत्पादन खर्च वाढेल पण शेतमालाचे सरकार भाव वाढू देणार नाही. कारण गरीब जनतेला अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिवाय कांद्यासारख्या वस्तूचे भाव वाढल्याने दिल्ली सारखी सत्ता बदल होण्याची भिती सर्वच राजकिय पक्षांना आहे. मिडीया थैयमान घालण्याचा दबाव सरकारवर नेहमीच असतो. एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता शेती क्षेत्राला मोठ्या परीणामास समोर जावे लागेल. म्हणून शेतकर्यांनी भविष्यात येणार्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहावे. माझ्या मते येत्या हंगामात ७५% जीवनावश्यक अन्नधान्याची लागवड करण्याचे नियोजन केले तर फायदयात राहील याला मार्केट मध्ये मागणी राहू शकते. नगदी पीकेपण २५% लावायलाच पाहीजे. लागवडी मध्ये विविधता असावी.
कमी कालावधीची पीके, मध्यम कालावधीची पीके,दिर्घ कालावधीची पीके असे नियोजन करून काही प्रमाणात मात करण्याचा प्रयत्न करता येईल. दुसरी बाजू खर्चात बचत फार महत्वाची राहील. मोठी जोखीम घेण्याचे टाळले तर बरे राहील. तसेही शेती क्षेत्र निसर्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आपण खर्च करतो पण उत्पन्नाची हमी देवू शकत नाही. तसाही शेतकरी वर्ग कर्जाने दारिद्रय़ाच्या वाटेवर आहेच. म्हणून शेती सोबत जोडधंदा सुरु करणे काळाची गरज आहे. आज शेतकर्यांना चांगल्या सल्लागाराची व मार्गदर्शकाची नितांत आवश्यकता आहे. बरेच शेतकरी कृषीमाल विक्रेते, विविध कंपन्यांचे मार्केटिंग कर्मचारी यांचे सल्ल्याने शेती करतात. फार कमी शेतकरी अनुभवी शेतकर्यांशी विचार विनिमय करून शेती करतो. पण येणारा काळ लक्षात घेता सद्सद्विवेकबुद्धीने शेती करणे आवश्यक राहील. हा लेख लिहीतांना शेतीतील अनेक वर्षांपासून येत असलेले अनुभव विचारात घेतले आहे. तसेच विद्यमान जागतीक घडामोडींचा विचार करुन लिहीले आहे. कदाचित ही परीस्थिती निर्माण झालीच नाही तर फारच चांगले होईल. आपला हितचिंतक शेतकरी
शिंदे सर
Share your comments