भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पारंपारिक शेती करत आहेत. मात्र या शेतीत सातत्याने त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता आता काही शेतकरी बांधव नवीन प्रकारच्या पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत.
मात्र असे असले तरी अजूनही अनेक शेतकरी बांधव पारंपारिक शेती करत असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देऊन नवीन नगदी पिकांची लागवड करण्याचा सल्ला देत असतात.
यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना मदतही करत आहेत. बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करण्यासाठी चर्चासत्र, तसेच अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम देखील जोरात केले जात आहे.
याच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. मित्रांनो खरं पाहता आता पारंपरिक पीकपद्धतीत होत असलेले नुकसान पाहता भारतातील शेतकरी बांधव महोगनी या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.
या झाडामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने याला बारामाही मागणी असते. शिवाय बाजारात या झाडाच्या लाकडाच्या किमती झपाट्याने आता वाढत आहेत. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, या झाडाच्या लागवडीसाठी उत्तर भारतातील तापमान अतिशय योग्य आहे.
असे असले तरी, देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही आता या झाडाची मोठ्या प्रमाणात शेती नजरेस पडत आहे. महोगनी लागवडीतून आता शेतकरी बांधव चांगला बक्कळ पैसा देखील कमवीत आहेत.
बातमी कामाची! बारामाही मागणी असलेल्या या विदेशी फळाची शेती करा आणि कमवा बक्कळ; वाचा सविस्तर
महोगणी लागवडीसाठी आवश्यक शेतजमीन
भारतात महोगनी लागवड आता अनेक ठिकाणी केली जाऊ लागली आहे. या झाडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या झाडाची लागवड स्नो झोन वगळता भारतात कुठेही केली जाऊ शकते. भारतातील तापमान या झाडाच्या वाढीसाठी अनुकूल असल्याचा दावा केला जातो.
याशिवाय या झाडाची अजून एक विशेषता म्हणजे, याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत सहज केली जाऊ शकते आणि चांगले उत्पादन देखील मिळवले जाऊ शकते. मात्र, असे असले तरी या झाडाची लागवड चिकणमाती असलेल्या शेतजमिनीत केल्यास यापासून चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते. या झाडाची लांबी 40 ते 200 फूटपर्यंत असते.
जास्त देखरेख करण्याची मुळीच गरज नाही
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, या झाडाची इतर झाडांच्या तुलनेत फारच कमी काळजी घ्यावी लागते. याशिवाय या झाडाची अजून एक विशेषता अशी की, या झाडाच्या वाढीसाठी खूप कमी पाणी लागते.
कृषी तज्ञांच्या मते, उन्हाळी हंगामात या झाडाला आठवड्यात दोनदा पाणी दिले तरी देखील याची चांगली वाढ होते. उन्हाळी हंगाम वगळता या झाडाला इतके पाणी लागत नाही. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, वसंत ऋतु किंवा पावसाळ्यात याला अजिबात पाणी लागत नाही.
महोगनी शेतीतुन किती होणार कमाई
मित्रांनो जर तुम्ही एक एकर शेतजमिनीत महोगनी लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एका एकरात याची 100 पेक्षा जास्त महोगनीची झाडे लावावी लागतील. एका एकरात एवढी झाडे लावली तर तुम्ही फक्त 12 वर्षात करोडपती होऊ शकता. या झाडाची एका बिघामध्ये शेती करायची असल्यास सुमारे 40-50 हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे.
मित्रांनो खरं पाहता महोगनीचे एक झाड 20 ते 30 हजारांना विकले जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर या झाडाची शेती सुरु केली तर त्याला करोडो रुपयांचा नफा राहणार आहे.
Share your comments