२००७ मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारामागे कमी खर्चाची व बिना कर्जाची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा मूळ उद्देश आहे. २००७ मध्ये अगदी छोट्या व प्राथमिक स्तरावरील कार्यक्रमापासून ते आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला वाटणारा पुरस्कार अशी या पुरस्काराची ख्याती आहे.
जय जवान जय किसान यांच्या सोबतीला जय विज्ञान अशी हाक देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानात भारताला पुढे नेणारे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी २१मे ला हा पुरस्कार सुरू असतो.गेल्या १३ वर्षांपासून आजपर्यंत १३२० प्रस्ताव या पुरस्कारासाठी निवड समितीकडे आले होते.त्यामध्ये एकूण १८२ शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.त्यामध्ये तूर,आंबा,कापूस,फुलशेती,संत्रा,भाजीपाला,पेरू यासोबतच कृषी शास्त्रज्ञ,महिला शेतकरी यांचा समावेश होतो.यातूनच प्रेरणा मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाचे कृषी पुरस्कार मिळालेले आहे.त्यामध्ये नुकताच नीता सावदे या अमरावती जिल्ह्यातील महिलेला जिजामाता कृषी भुषण पुरस्कार मिळालेला आहे.
राष्ट्रीय स्तर व प्रादेशिक स्तरावरील कृषितज्ज्ञ व मान्यवरांनी या उपक्रमासाठी प्रकाश साबळे यांचं उपक्रमाचे कौतुक केले.
दरवर्षी १० मे पर्यंत पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित केले जातात व नंतर गठीत केलेली समिती प्रत्येक प्रस्ताव करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन पाहणी करतात.यामध्ये अमरावती जिल्हा सोयाबीन उत्पादक संघ या ३ हजार शेतकरी सदस्य असलेल्या संस्थेची प्रकाश साबळे यांना मदत होते. ते खुद्द या संस्थेचे अध्यक्ष आहे.कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ देऊन गौरविण्यात येते. लोकवर्गणीतून कोणतीही शासकीय मदत न घेता काम करणाऱ्या प्रकाश साबळेंना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या श्रमाची कहाणी व त्यांची यशकथा पोहचवायची आहे.
७० एक्कर शेती ते स्वतः करतात शेती पुरवळत नाही असे म्हणणाऱ्यांना ते फळकट्टपणे आळशी म्हणतात. तेव्हा स्वतः एकरी ११ क्विंटल सोयाबीन तूर या पिकासोबत आंतरपीक पद्धतीने घेतल्याचे ते सांगतात.तेव्हा कुठेतरी आपल्याला त्यांच्या म्हणण्यातील तथ्यता वाट्ते.
हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे होणार होता. दिगग्ज नेते व कृषी क्षेत्रातील मान्यवर मंडळी निमंत्रित होती, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे जी आपदा परिस्थिती निर्माण झाली,त्यामुळे सदर सोहळा रद्द करण्यात आला. पण लॉकडाउनमुळे जगातील विविध व्यवसाय व उद्योग थांबले परंतु आमचा अन्नदाता शेतकरी थांबला नाही.त्याने कष्ट करत श्रमाची फुले करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अश्या जगाच्या पोशिंद्याच्या सन्मानीत खंड पडू नये म्हणून २१ मे २०२० ला प्रकाश साबळे यांनी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेचे पालन करून सन्मान करण्याचे निश्चित केले.ही बाब संपूर्ण शेतकरी समाजासाठी भूषणावह व अभिनंदनीय आहे.
खूप मोठ्या पद्धतीचे आयोजन नाही.काही झगमगाट नाही,प्रसिद्धीची हाव नाही.शेती परवडत नाही,शेती तोट्यात चालली आहे म्हणून सतत हाकाटी होत असते.म्हणून नवीन पिढीने नियोजनाने (हातात वही पेन घेऊन शेती केली पाहिजे) असा त्यांचा आग्रह आहे.शेती करणे व शेतकरी/कास्तकार असणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे आपले ठाम मत असल्याचे ही ते सांगतात.
आणि राजकारणापेक्षा त्यांना समाजकारणात जास्त गोडी आणि रस असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते
लेखक - अमोल भारसाकळे
Share your comments