1. कृषीपीडिया

कोकणात गेले आहात का? हो. मग तुम्ही बघितल्यात ना काजूच्या बागा. आज जाणुन घ्या संपूर्ण काजु पिकाविषयीं

काजूच्या पिकासाठी उष्णकटिबंधीय हवामान उत्तम मानले जाते. याशिवाय, उष्ण आणि दमट हवामानासारख्या ठिकाणी त्याचे उत्पादन खूप चांगले आहे. काजूच्या चांगल्या उत्पादणासाठी 600-700 मिमी पाऊस गरजेचा असतो. काजुविषयी थोडक्यात! काजू हे सुका-मेव्यातील एक खूपच महत्वाचा पदार्थ. त्यासोबतच काजु हा जेवणात वापरला जातो, तसेच मिठाई बनवण्यासाठी आणि भाजी (dish garnishing) सजवण्यासाठी काजुचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
cashew cultivation

cashew cultivation

काजूच्या पिकासाठी उष्णकटिबंधीय हवामान उत्तम मानले जाते. याशिवाय, उष्ण आणि दमट हवामानासारख्या ठिकाणी त्याचे उत्पादन खूप चांगले आहे. काजूच्या चांगल्या उत्पादणासाठी  600-700 मिमी पाऊस गरजेचा असतो.

 

 

 

 

काजुविषयी थोडक्यात!

काजू हे सुका-मेव्यातील एक खूपच महत्वाचा पदार्थ. त्यासोबतच काजु हा जेवणात वापरला जातो, तसेच मिठाई बनवण्यासाठी आणि भाजी (dish garnishing) सजवण्यासाठी काजुचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

काजूचा वापर दारू बनवण्यासाठीही केला जातो.  यामुळेच काजूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.  काजू निर्यात करणे हा एक मोठा व्यवसाय बनलाय. त्याची लागवड करून शेतकरी भरपूर नफा कमवू शकतो.

काजू झाडावर येतात. त्याच्या झाडांची लांबी 14 ते 15 मीटर पर्यंत असते. काजुची झाडे तीन वर्षात फळ देण्यास तयार होतात. काजू व्यतिरिक्त, त्याची साल देखील वापरली जाते.  पेंट आणि लुब्रिकन्ट त्याच्या सालापासून तयार केले जातात, म्हणून काजुची शेती फायदेशीर ठरू शकते.

 

 

 

 

कस काय करत असतील काजूची लागवड?

 हे उष्णकटिबंधीय प्रदेशात चांगले वाढते. ज्या ठिकाणी तापमान सामान्य आहे तेथे काजुची लागवड करणे योग्य असते. यासाठी समुद्राचा तळ लाल आणि लेटराईट माती त्याच्या पिकासाठी चांगली असल्याचे विशेषज्ञ सांगतात. म्हणून त्याची लागवड दक्षिण भारतात आणि आपल्या महाराष्ट्रातील कोकणात मोठ्या प्रमाणावर केली जाते.

त्याची लागवड समुद्र सपाटीपासून 750 मीटर उंचीवर केली पाहिजे. चांगल्या उत्पन्नासाठी, काजुला ओलावा आणि थंडीपासून बचाव केला पाहिजे. कारण ओलावा आणि थंडीमुळे त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो. काजूची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास दुसऱ्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. पण त्यासाठी तज्ञाचा सल्ला घेणं मोलाचे ठरेलं.

 

 

 

 

 

 

जाणुन घ्या काजूसाठी असलेला सर्वोत्तम हंगाम

काजू लागवडीसाठी उष्णकटिबंधीय हवामान उत्तम मानले जाते. याशिवाय, उष्ण आणि दमट हवामानासारख्या ठिकाणी त्याचे उत्पादन खूप चांगले येते. काजूच्या झाडांना चांगले वाढण्यासाठी 600-700 मिमी पाऊस आवश्यक असतो. नेहमीपेक्षा थंड किंवा उबदार असल्यास काजूच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यातील दंव देखील काजूच्या पिकाचे नुकसान करते.

 

 

 

 

 

 

 

काजूच्या लागवडीसाठी कशी करतात शेतीची तयारी?

काजू लागवडीसाठी शेत दोनदा खोल आणि तिरपे चांगले नांगरुण घेतलेले असावे. लागवडीच्या वेळी काजुच्या दोन रोपांमधील अंतर चार मीटर असावे. अशा प्रकारे लागवड केल्यास एका हेक्टरमध्ये 500 रोपे लावता येतात. लागवडीपूर्वी शेणखत योग्य प्रमाणात खड्ड्यात भरावे लागते. यानंतर खड्डे चांगले भरून पिकाला पाणी द्यावे. काजूची रोपे तयार करण्यासाठी त्याची बियाणे थेट शेतात लावली जाऊ शकतात.

 

काजूची रोपे लावण्यासाठी खड्डा एक महिना अगोदर तयार करावा. यानंतर, खड्डयातील निंदनी करून घ्यावी घाण कचरा काढून घ्यावा आणि; त्यात एक छोटा खड्डा करून तुम्ही काजूची रोपे लावू शकता. पावसाळ्यात त्याची लागवड केल्यास पाण्याची गरज नसते आणि झाडे लवकर तयार होतात.

 

 

 

 

 

 

काजू पिकातून मिळणारे उत्पादन

एकदा लावलेली काजूची झाडे अनेक वर्षे उत्पन्न देतात. काजूच्या लागवडिवेळी खर्च येतो. एका हेक्टरमध्ये 500 काजूची झाडे बसतात. एक झाड सरासरी 20 किलो काजू देते. यामुळे एका हेक्टरमध्ये सुमारे 10 टन काजूचे उत्पादन मिळते. यानंतर त्याच्या प्रक्रियेमध्ये देखील खर्च येतो. मग बाजारात काजू 700-800 रुपये प्रति किलोने विकला जातो.

English Summary: technic of cashew cultivation Published on: 28 August 2021, 09:12 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters