हवामान खात्याच्या या माहितीने सुखावणाऱ्या बळीराजांने खरीप हंगामाची सुरुवात केली आहे. खरीप हंगामाध्ये तूर महाराष्ट्रातील मुख्य पिकांमध्ये मोडलं जाते. तुरीचे पीक हे कमी पावसाच्या ठिकाणी आणि पाणी मुबलक उपलब्ध आहे अशा ठिकाणी घेतलं जाणारे पीक आहे.दरवर्षी विक्रमी उत्पन्न महाराष्ट्र राज्यामधून घेतले जाते आणि तुरीला खूप चांगला बाजारभाव सुद्धा मिळतो. त्यामुळे कमी पाऊस असलेल्या किंवा पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागात तूर प्रमुख्याने घेतली जाते. कारण तूर कमी पाण्याला तग धरून राहते तसेच कमी मेहनतीमध्ये चांगला नफा मिळवून देते. पण बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन वाण व खत नियोजन
योग्य पद्धतीने कसे करता येईल त्याबद्दल माहिती नसते. याविषयीची माहिती करून देणे महत्वाचे आहे. आज आपण याविषयीची माहिती घेणार आहोत. तर चला पाहूयात तूर लागवडीचे तंत्रज्ञान.जमीन आणि हवामान- तुरीच्या लागवडीसाठी आधी आपण जमिनीची माहिती घेऊ. तुरीसाठी जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा करणारी, मध्यम ते भारी जमीन फार चांगली. शक्यता चोपण जमिनीमध्ये तूर लागवड करू नये. त्या जमिनीतून भरघोस उत्पन्न निघत नाही. पोयट्याची जमीनही लागवडीसाठी चांगली आहे. या पिकाला २१ ते २७ सेल्सिअस डिग्री तापमान मानवते.
जमीन आणि हवामान- तुरीच्या लागवडीसाठी आधी आपण जमिनीची माहिती घेऊ. तुरीसाठी जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा करणारी, मध्यम ते भारी जमीन फार चांगली. शक्यता चोपण जमिनीमध्ये तूर लागवड करू नये. त्या जमिनीतून भरघोस उत्पन्न निघत नाही. पोयट्याची जमीनही लागवडीसाठी चांगली आहे. या पिकाला २१ ते २७ सेल्सिअस डिग्री तापमान मानवते. पूर्वमशागत- उन्हाळ्यामध्ये चांगली खोल नांगरटी करून घ्यावी. तापलेल्या जमिनीमुळे त्यातील किडी, अंडी व कोप इ. नष्ट होतात त्याचबरोबर सच्छिद्रता वाढते. हेक्टरी १०-१५ टन कुजलेले शेणखत घालून घ्यावे.
वाण- लागवड करताना कोणते वाणांची पेरणी करावी याविषयी पण आपण काळजी घेतली पाहिजे. बाजारात अनेक कंपनीचे वाण असतात. त्यातील कोणता चांगला आहे याची निवड करून आपण त्याची पेरणी आपल्या शेतात करावी. खाली काही वाणांचे नाव दिले आहेत, शेतकरी या वाणांची पेरणी आपल्या शेतात करत असतात. वाणा सोबत किती दिवसात आपल्या उत्पन्न मिळते याचीही कल्पना दिलीआहे.आय.सी.पी.एल-११२५५,आय.सी.पी.एल-२०३४०, आय.सी.पी.एल-२०३३८ (९०-१०० दिवस) बी.डी.एन.-७११ (१५०), फुले-टी ००१२ (१३५-१५०), बी.डी.एन.-७१६ (१६०-१६५), आय.सी.पी.एल- ८७ (१२० दिवस), ए.के.टी.- ८८११ (१४० दिवस), बी.एस.एम.आर.- ८५३ (१६० दिवस), बी.एस.एम.आर.- ७३६ (१७० दिवस), विपुला (१४५-१६० दिवस) हे सुधारित वाण आहेत आणि उत्पन्न ही चांगले आहे.
विनोद धोंगडे
Share your comments