1. कृषीपीडिया

केळी उत्पादकांचे विदारक सत्य वेळ काढून वाचा

केळी पीकावरील मोठे संकट सी .एम.व्ही ( कुकुम्बर मॉझेक व्हाईरस ) साधारण२० वर्षा पुर्वी मोठे उत्पादन देनारे वाण म्हणून G9हे परदेशी केळी आपण भारतात उती संवर्धन ( टिशु कल्चर )या माध्यमातुन आणले खर तर त्याच वेळी केळी उत्पादकांची अधोगतीला सुरवात झाली ( प्रगतीला नव्हे ) कारण अधिक उत्पादनाच्या नावाखाली आमच्या देशी जाती( बसरई / वसई / हरसाल / पाडळसे / शेंदुर्णी / लाल वेलची / सफेत वेलची 'शेतकरी संशोदित श्रीमंती ) नामशेष करण्याचे काम सुरू झाले .

KJ Maharashtra
KJ Maharashtra
आता शेतकऱ्यांना (हायब्रीड बियाणे ) सारखे परावलंबी बनविले गेले आपण रोपासाठी ४ I४ महीने अगोदर पैसे भरले व याचका प्रमाणे रोप कंपण्या समोर तारीख तारीख रोप साठी त्यांची मनमनी त्यांच्या शर्ती मानुन कष्टाचे पैसेे देवुन आपण रोप घेतली.

आता शेतकऱ्यांना (हायब्रीड बियाणे ) सारखे परावलंबी बनविले गेले आपण रोपासाठी ४ I४ महीने अगोदर पैसे भरले व याचका प्रमाणे रोप कंपण्या समोर तारीख तारीख रोप साठी त्यांची मनमनी त्यांच्या शर्ती मानुन कष्टाचे पैसेे देवुन आपण रोप घेतली.

तिथच आपली अधिक उत्पादनाच्या दिशेने असलेली वाटचाल तीच फसवुकीस अधोगतीस कारण ठरली ३ महीण्यात एकाच वेळी सर्वरोप लागवड व एकच वेळी निसवणूक हा गुण आपल्या साठी अवगुण ठराला सर्वांचा माल एकाच वेळी आला 

  तिथुनच व्यापारी गब्बर झाला

 

आपन पिढीजात ७पिढयांचे केळी बागदार अगतीक होऊन ३०० / ४o० कमी ने आपला माल ज्याच्या( बापान )? केळीपुर्ण पाहीली नाही अशा दलाल. / ये तो बोंडसे है / चोच निकली है कुच्चर है / भुरा पडा है / ये तो बकेट टाईप है. अस म्हनणाऱ्या व्यापाऱ्याला पटे ओ काटलो भाई म्हणून मुकाट्यान देवु लागलो

रोप जास्त उत्पादन देणारे. म्हणून रासायणीक खताचे डोस दुप्पट् केले ( उत्पादन वाढणार खत उत्पादकांचे ) शेतकरयाचे नाही कारण वाढलेले उत्पादन खत कारखानदार (अलगत ) तुम्हास न समजता घेउन जाणार नफा वाढीव उत्पादनाच्या पोटी आपन काय मिळवल

क्षारयुक्त अती पीएच असलेली कडक जमीन

मग समस्या हि व्यापाराची जननी मग जमीन नरम करणारे भुसंवंर्धक आले अॅसिड आले दुयम अन्नद्रव्य सुक्ष्म अन्नद्रव्य आले काय नव्हते ते आले लाखो करोडोचा व्यापार करुण आपल्या हातातील नफा घेवुन गेले आपण काय ?

रोप आल१२ / १५ / १८ / काय स्टेज ? बिना पावती आल पण आल पहील्याच दिवसी पाठीवर पंप ड्रेचिंग (परमपरागत खोड /कंद / बेने / आरू / ) यांना कधी ड्रेचिंग नाही लागल कारण हे उच्च उत्पादनy देणार रोप होत आता सुरवात होती रासायणीक औषधे विक्रेत्याची मग काय बुरशी आली / मर/ मग काय तर शासनाला विषेश पॅकेज ६०० कोटी दयायला लावणारा करपा आता तर सी एम व्ही आला त्यात भर काय रोपावर अळी पडली मग काय ४ I५ हजार रुपये लिटरच्या कोराजनच्या ३ ' ३ फवारण्या केल्या उच्च उत्पादन देणार रोप होत भाऊ ( बसरई / वसई ' हरी साल /V श्रीमंती कधी करपा बुरशी अळी नाही आली )

यान सुद्धा आपला वाढलेला नफा ड्रेचिंग / बुरशीने ( कृषी सेवा केंद्रा न)हळूच नेला

 मग काय उच्च उत्पादन क्षमता पाण्याचा ताण सहण करणार नाही इतर सर्व उन्हाळी पीके ( पिक )बंद तरी पन म्हणे काय कमरेत मुडते ( दादा आपन कधी वसई / बसरई / यांना टेके नाही दिले असो )वजन जास्त टेके लावा मग आमची स्टिक काठी ३५ रुपये नाही तर बांबू तर आहेच २०ते ३०रु मध्ये मग केळी बागेतGg येणारा २ / ३ बांबु नेणार सहज / बकरी चारणारा नेणार आपण सिझनला १०.००० (बांबु ) लावणार व आटोपल्यावर २००० / ४००० ( ( बांबु ) सर्वानां आपला नफा देवुन नेणार आपल्यालावर वखारपासुन ते बकरी कुड या या सर्वांना नफा देने आहे

 मग काय केळी परदेशी जाणार जाणार नटून थटून पैसा तुम्ही लावा प्लास्टीक बैग५ते १४ रुपये (१ बैंग ) प्लास्टीक बॅग उत्पादक कमावनार निर्यातदार त्यात बॅग मायक्रॉन ची अट घालणार त्याचा हिस्सा आपल्याच वाढीव नफ्यातुन जाणार ( हळूच जाणार ) आपली केळी परदेशी जाते या आनंदाने , आपल्या मालाचा नविन एक दलाल भागिदार होणार केळी पीक विमा मागील १० वर्षाचा भागीदार आपन नंबर लावुन भरणार कर्ज पाहीजे बैक विमा काटाणार पण विमा सुद्धा ५ वर्षात निवडणूक ज्या वर्षी त्याच वर्षी मंजुर होणार तो बॅक कर्ज खात्यात जमा होणार आपण भांडणार मग राजकीय नेता आश्वासन देणार डिजीटल बोर्ड लावुन मोर्चाच आपण खुष 

वा विमा वा विमा संरक्षण ( कि शेतकरी शोषण )

 मी नविन तंत्रज्ञान किंवा उति संवर्धीत रोपाचे विरोधात नाही माझा विरोध आहे शेतकऱ्यांना फसविणाऱ्या व्यवस्थेला ( त्यात राजकीय / तथाकथीत केळी तज्ञ / व्यापारी या साखळीला )

 आज तर या साखळीने कहरच केला म्हणे रासायनिक खते वापल्याने सी एम व्ही आला वा निष्कर्ष

अहो तुम्हीज तथाकथीत केळी तज्ञ N२०० P१२५ K४००चा रासायनिक खताचा डोस सांगना रे सरकारी / खाजगी तज्ञ तुम्हीच ना ?

पाप तुमची दोष मात्र शेतकऱ्यांचा माथी ?

 वा केळी तज्ञ वा दिल्ली टिम

 वाचवलत तुम्ही खाजगी रोप पुरविणाऱ्या कंपण्यांना सरकारी पगार भत्ता घेऊन अभिनंदन तुमचे

 शेतकरी दादा आता तरी जागा हो 

बोगस औषय तुझा दोष ?तु का घेतली

बोगस खत तुझा दोष ? तु का घेतली

 बोगस रोप आली तुझा दोष ?तु का घेतली

रोग आला तुझा दोष ? तु का 

रासायनिक खत वापरली

 दादा तुझा दोष तु शेती करतोस आणी शेतकरी आहेस

१५ वर्ष शेती करतांना जे अनुभवले / भोगले / सोसले / दिसले / तेच सांगीतले

यावर कुनाचा वाद विवाद संवाद प्रतिसाध असु शकतो

पण हे अंतिम विदारक सत्य आहे केळी उत्पादकांचे

॥जय जवान ॥जय किसान ॥

आपला 

      मीच तो शेतकरी व्यवस्थीचा बळी राजा.. 

आपलाच हितचिंतक शेतकरी

 

संकलन - विनोद भोयर

प्रतिनिधी गोपाल उगले

 

English Summary: Take the time to read the grim truth of banana growers Published on: 09 September 2021, 07:24 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters