खरीपात बियाणे विक्रीत्यांकडून फसवणूक, तसेच बियाणांचा तुटवडा यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान निश्चितच होते. यंदा उन्हाळ्यातील सोयाबीन शेत बहरलेले दिसत असून. निसर्गकृपेने यंदा सोयाबीन पिक चांगलेच फुलले दिसत आहे. यंदा बियाणांचा प्रश्न देखील मिटेल आणि शेतकर्यांना नफा देखील होईल. मात्र शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन केले तरच फायद्याचे ठरणार असे मत कृषी विभागाने मांडले आहे. कृषी विभागाने घेतलेल्या पुढाकारातूनच उन्हाळी सोयाबीनची संकल्पना ही समोर आली आहे.
या हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतले असून. 6 हजार 996 हेक्टरवर उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या एमएयूएस 71, एमएयूएस 162, एमएयूएस 612, फुले किमया, फुले संगम या वाणांचा बीजोत्पादन प्रस्तावित झाला. शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करण्यासाठी सातबारा,
आधार कार्ड, बॅंक पासबूकची झेरॅाक्स ही जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावे नंतरच आरक्षण करुन घेतले जाणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी सांगितले.
उन्हाळ्यात सोयाबीनचा उतारा हा कमी प्रमाणात होतो याचे कारण हंगाम नसताना हे पिक घेतला गेले. शिवाय कीड व रोग आणि उन्हाची तीव्रता यामुळे उत्पादनात घट होते त्यामुळे उन्हाळी हंगामातील सोयाबीनमधून उत्पादनाची आशा न बाळगता शेतकऱ्यांनी थेट बीजोत्पादन करुन बियाणे करावे
असा सल्ला कृषी विभागाच्या माध्यमातून दिला. शिवाय उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा मुळात हाच उद्देश आहे. बीजोत्पादन करुन शिल्लक सोयाबीन विक्री केले तर फायदा शेतकऱ्यांचाच आहे.
सोयाबीन हे खरिपातील पीक असले तरी सध्या उन्हाळ्यामध्ये या पिकाने शिवार हिरवागार केला आहे. शिवाय अधिकचे पाणी लागत असताना देखील योग्य नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी तीन ते चार
फवारण्या केल्या आहेत शिवाय पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लरचा वापर केला आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीन बहरत असून सध्या फुल आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत हे पीक आहे. केवळ कृषी विभागाच्या आवाहनानंतर पेराच नाही तर त्यानंतरही योग्य जोपासना केल्याने हे पीक बहरत आहे. उत्पादन आणि खरिपातील बियाणे असा दुहेरी हेतू साधण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.
यंदा बियाणांचा प्रश्न देखील मिटेल आणि शेतकर्यांना नफा देखील होईल. मात्र शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन केले तरच फायद्याचे ठरणार असे मत कृषी विभागाने मांडले आहे. कृषी विभागाने घेतलेल्या पुढाकारातूनच उन्हाळी सोयाबीनची संकल्पना ही समोर आली आहे.
Share your comments