खूप मोठ्या प्रमाणावर उन्हाळी सोयाबीन लागवड यावर्षी होत आहे, परंतु सोयाबीन लागवड करताना आपल्याला किती उत्पादन येईल व त्यासाठी खर्च किती करायचा हे बघणे गरजेचे आहे.
@ खूप जास्त प्रमाणात लागवड होत आहे भाव चांगले आहे म्हणून काही विचार न करता लागवड करून नुसता खर्च न करता उत्पन्न मिळेल यादृष्टीने प्रयत्न केले तर ते शक्य होईल.
त्यासाठी महत्वाचे मुद्दे.
मुद्दा १ : वेळेवर लागवड म्हणजे ( २५ डिसेंबरते १५ जानेवारी ) त्यानंतर लागवड करणे टाळावी किंवा लवकर येणारे वाण निवडावे.( RVS-१८, JS -९३०५ आणि PKV-१००३९).
मुद्दा २: पेरणी करताना पूर्व - पश्चिम आणि खरीप पेक्षा जास्त ( २५-२७ किलो ) बियाणे वापरून व अंतर कमी ( ३०-३८१० सेमी किंवा ४५ १० सेमी ) याप्रमाणे.
बीज प्रक्रिया : Carbendazim २५ % + Mancozeb ५० % WS ३ gm व Thimethoxum ३० FS ३ ml प्रती किलो याप्रमाणे.
बीज प्रक्रिया : Carbendazim २५ % + Mancozeb ५० % WS ३ gm व Thimethoxum ३० FS ३ ml प्रती किलो याप्रमाणे.
खत @ एक ते दीड बॅग DAP किंवा १०:२६:२६ सोबत २ किलो Fertera ( Chlorantraniprole ४% GR ) किंवा ३ किलो ( Thiemthoxum ०.२+ Fipronil ०.९ % GR)
फवारणी जास्त महाग करू नये शक्यतो जास्त खर्च होईल असे नियोजन टाळावे.
२ -३ फवारणी केल्या तरी चालेल @ पहिली २५ दिवसांनी
दुसरी @ ४५-५५ आणि तिसरी ६० ते ७५ दिवसांनी.
@ पहिली
१०० gm १९:१९:१९
Carbendazim + Mancozeb २५ gm
Profenophos+ Cypermethrin ४० ml
@ दुसरी
Tebucanazole+ sulfur २० gm
किंवा Hexacanazole २५ ml
आणि Emamectin benzoat किंवा
Carbosulphon
आणि ०:५२:३४ १०० gm
आणि एखादे टॉनिक जे फुले लागण्यास मदत करेल व फुले टिकवून ठेवले ( Flemburg, FULORA, AMBISION)
PLANOFIX २ ML वापरले तरी चालेल.
तिसरी फवारणी
Propicanazole किंवा
Azoxystribin किंवा
Propicanazole+ trycyclazole सोबत
Emamectin benzoat + Novaluaron किंवा
Emamectin benzoat + Lufenuron किंवा Coragen किंवा Ampligo आणि
१०० ppm Gebrelic acid आणि ५० gm ०:०:५०
याप्रमाणे
यापेक्षा अधिक काही करायची गरज नाही/ जास्त प्रमाणात खर्च वाढवू नये उन्हाळी सोयाबीन ही कमीच उत्पादन देते.
शक्यतो सरी वरंबा पद्धतीपेक्षा पेरणी करावी व पाणी हे पाठ पाणी किंवा sprinkler ने द्यावे व मार्च - एप्रिल मधे पाणी हे sprinkler ने जास्त वेळ द्यावे म्हणजे शेतात पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रमाणे द्यावे म्हणजे एकदाच जास्त प्रमाणात पाणी न देता ३-४ दिवसांनी थोडे - थोडे पाणी देयाचे.
जर एप्रिल मधे उन्ह जास्त प्रमाणात वाढले तर सोयाबीन चे शेंगा हिरव्याच वाळू लागतात त्यावेळी त्यावेळी आपण उन्हापासून सोयाबीन चे संरक्षण करण्यासाठी Amino acid/ Absacic acid / Glycine beaten and Gebrelic acid यांची शास्त्रीय सल्ला घेऊनच फवारणी करावी.
उन्हाळी सोयाबीन नंतर जर लगेच खरीप मधे त्याच शेत सोयाबीन घेणार असाल तर उन्हाळी सोयाबीन सर्व अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे त्यामुळे कॉलर रॉट या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा खोडमाशी चा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशाप्रकारे काळजीपूर्वक नियोजन करून शेतकरी बांधवणी उन्हाळी सोयाबीन लागवड करावी. वेळोवेळी अनुभवी शेतकरी व शास्त्रज्ञ यांचा सल्ला घ्यावा.
वरील व्यवस्थापन हे अनुभवानुसार लिहिले आहे हवामान बदल व इतर गोष्टी यामुळे यामधे बदल करू शकता.
धन्यवाद
Share your comments