1. कृषीपीडिया

पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे गंधक; जाणून घेऊन त्याची कार्य आणि महत्त्व

sulphur

sulphur

 गंधक हे  पिकांच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ले तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे.जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्त्वाचा असून वनस्पती श्वसन क्रिया, तेलनिर्मिती व हरिद्रव्य तयार करण्यासाठी गंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

जमिनीतून पिके विशेष जास्त उत्पादन देणारे संकरित वाण दर हंगामात गंधकाचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतात. या लेखात आपण उपयुक्त अशा गंधकाचे महत्त्व आणि त्याची कार्य याविषयी माहिती घेणार आहोत.

पिकांमध्ये गंधकाचे महत्त्व

1-गंधकाच्या वापरामुळे उत्पादनात बरीच वाढ होते.

2- गंधकाच्या वापरामुळे कृषिमालाच्या उत्पादकतेत व गुणवत्तेत वाढ होते.

3- गंधकामुळे जमिनीचे आरोग्य आणि चिरस्थायी उत्पादकता टिकविता येते.

4-गंधकामुळे नत्राची कार्यक्षमता व उपलब्धता वाढते.

 गंधक आला भूसुधारक असे म्हणतात कारण गंधक मातीचा सामु कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत लाभदायी ठरतो.

6- अतिशय महत्त्वाचे म्हणजे गळित धान्य मध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी गंधकाचा उपयोग होतो.

7- गंधकामुळे पर्यावरण संवर्धन होते.

8- गंधकाचा इतर अन्नद्रव्यांसोबत सकारात्मक फायदा होतो.

 पिकांमध्ये गंधकाची कार्य

 • गंधक हे प्रकाशसंश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधी  हरितद्रव्य वाढविण्यास मदत करते.त्यामुळे पिकांच्या अन निर्मितीला चालना मिळते.
 • वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ यामध्ये आढळते. ये तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते.
 • गंधक हे अमिनो ऍसिड तयार करण्यास मदत करते व तो त्याचा घटक आहे उदा. सिस्टीन व सिसटाईन म्हणजेच प्रथिने तयार होण्यास गंधक आवश्यक आहे.
 • गंधक हा मिथीओनाईन, थायमिन आणि बायोटिन यांचा महत्वपूर्ण घटक आहे.
 • गंधक हरीतद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यात गंधकाचे आवश्यकता असते. जर पिकांमध्ये गंधकाचे प्रमाण कमी झाले तर 18 टक्क्यांपर्यंत हरितद्रव्य कमी तयार होते.
 • गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठी मध्ये वाढहोण्यास व जिवाणू द्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करते.
 • वनस्पतींच्या निरनिराळ्या विकारांच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत करते.
 • फळे तयार होण्यास गंधकाचे अत्यंत आवश्यकता असते.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters