आपल्याला माहित आहेच की, जेव्हा ऊसतोड संपते तेव्हा उसाच्या शेतामध्ये उसाच्या पाचटाचा पूर्ण पसारा पडलेला असतो. बहुतांशी शेतकरी उसाची पाचट पेटवून देतात व ठेवलेल्या खोडव्याची तयारी सुरु करतात. परंतु उसाची पाचट जाळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. परंतु हीच पाचट लागणारे आवश्यक प्रक्रिया करून जर जमिनीमध्ये कुजवली तर नक्कीच जमिनीचे आरोग्य सुधारते व त्याचा परिणाम पीक उत्पादन वाढीवर दिसून येतो. या लेखात आपण उसाच्या पाचटाचे फायदे जाणून घेऊ.
नक्की वाचा:'पिवळा मोझॅक' सोयाबीन पिकाचा आहे शत्रू, 'ही'आहेत या रोगाची लक्षणे आणि उपाय
उसाच्या पाचटाचे फायदे
1- होते पाण्याची बचत आणि तणनियंत्रण- उसाच्या शेतामध्ये पडलेली पाचट जर जाळली तर जमिनीसाठी चे उपयुक्त घटक असतात ते आगीत नष्ट होतात व एवढेच नाही तर त्यामुळे जो काही धूर तयार होतो, त्यामुळे वातावरण प्रदूषणाच्या समस्या देखील निर्माण होते.
पण हीच उसाचे पाचट कुट्टी करून जमिनीमध्ये कुजवली तर जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याचे जे काही बाष्पीभवन होते ते सुद्धा यामुळे रोखले जाते व साहजिकच पाण्याची बचत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतामध्ये पाचट कुजवल्यामुळे शेतामध्ये तण जास्त होत नाही.
शेतामध्ये पाचटाचा वापर कसा करावा?
ऊस तोडणी झाल्यानंतर जी पाचट शिल्लक राहते, त्या पाचटाची यंत्राच्या साह्याने कुट्टी करून ती कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सल्फेट,फॉस्पेट खत टाकून पाणी द्यावे. ही प्रक्रिया झाल्यानंतर छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर फिरवल्याने पाचट जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळते तसेच ऊसाला मातीची भर देणे गरजेचे आहे.
पाचट कुजण्याचे अनमोल फायदे
जरा पण एकंदरीत विचार केला तर एक हेक्टर क्षेत्रात कमीत कमी आठ ते दहा टन पाचट मिळते.
एवढ्या पाचट मधून 0.5 टक्के नत्र,0.2टक्के स्फुरद,एक टक्का पालाश तर 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब मिळते.
याचा अर्थ पाचट मधून 40 किलो नत्र तसेच 20 ते 30 टक्के स्फुरद आणि 75 ते 100 किलो पालाश मिळते. हे आवश्यक घटक जमिनीला उपलब्ध झाल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि पर्यायाने पीक उत्पादनात वाढ होते.
Share your comments