कोणत्याही हवामानात हलक्या जमिनीत व पावसाच्या पाण्यात सुद्धा शेवग्याची लागवड करता येते.हवामान व जमीन :कोणतेही हवामानामध्ये शेवग्याचे पीक चांगल्या प्रकारे वाढू शकते. हलक्या ते भारी जमिनीत या पिकाची लागवड करता येते. ज्या भागांमध्ये पाऊस जास्त प्रमाणावर होत आहे आशा डोंगर उतारावर हलक्या जमिनीत सुद्धा शेवगा पिक व्यवस्थितपणे आणता येतो.सुधारित जाती :पी.के.एम.-१, पी.के.एम.-२, कोइमतूर- १, कोइमतूर- २ आषा विविध जाती तामिळनाडू कृषी विद्यापीठ यांनी प्रसारित केले आहे. या जातींची झाडे जवळपास पाच ते सहा मीटर उंच वाढतात. या झाडास 16 ते 22 फांद्या असतात . पी.के.एम.-२ या जातीचे शेवगा चे पिक लागवडीपासून सहा ते सात महिन्यामध्ये शेंगा द्यायला सुरु करते. या वानाच्या शेंगा स्वादिष्ट व रुचकर आहेत लांबीला जास्त व हिरव्या रंगाच्या शेंगा असल्यामुळे या शेंगांना चांगला भाव मिळतो .
लागवडशेवगा पिकाची लागवड करत असताना पावसाळ्यापूर्वी 60 मीटर लांब, रुंद आणि खोल खड्डा काढून घ्यायचा आहे. व त्या खड्ड्यामध्ये माती, कुजलेले शेणखत एक घमेले, सुफला 15:15:15 250 ग्राम व 10 टक्के लिन्डेन पावडर 50 ग्राम हे वेवस्थित पणे मिक्स करून प्रत्येक खड्यात भरून घ्यायचे आहे शेवग्याच्या लागवडीसाठी दोन झाडांतील व दोन ओळींतील अंतर हे तीन मीटरच्या आसपास असावी.
हे ही वाचा - कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापण
यासोबत शेताच्या बांधावरच्या लागवडीसाठी तीन मीटर अंतर ठेवावे.लागवडीचा कालावधी :जून जुलै महिन्यामध्ये पाऊस सुरु होतो त्या वेळी वातावरणामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. हवेमध्ये आर्द्रता वाढते असे हवामान शेवगाच्या लागवडीसाठी उत्तम असते त्यावेळी या पिकाची लागवड करावी आंतरपीक :शेतकरी मित्रांनो आंबा चिकू जांभूळ चिंच आवळा लिंबू सिताफळ या फळांच्या बागेमध्ये पहिली पाच ते सहा वर्षे आंतरपीक म्हणून शेवगा पीक घेता येते शेवगा पिकाची लागवड योग्य अंतर सोडून एकसमान पद्धतीने केल्यास खरीप हंगाम मध्ये सोयाबीन, मूग, उडीद, हुलगा इत्यादी अशा कडधान्याची यासोबतच रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याची लागवड करता येते अशाप्रकारे आंतरपीक घेऊन आंतरपिकातून व शेवगा पिकातून उत्पन्न काढता येईल.
मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करणार असाल व पाण्याची उपलब्धता व्यवस्थित असेल नगदी पिके घेणे फायद्याचे ठरेल.लागवडीनंतर घ्यावयाची काळजी :वावरामध्ये तणांचा उपद्रव होऊ नये यासाठी झाडांची आळी वेळोवेळी खुरपून स्वच्छ करावी तसेच दोन झाडांच्या ओळी मध्ये वखरणी करावी प्रत्येक झाडास १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र , ५० ग्रॅम स्फुरद व ७५ ग्रॅम पालाश द्यावे.शेवग्याची झाडे झपाट्याने वाढतात त्यामुळे त्यांना योग्य आकार देणे आवश्यक आहे त्यांना व्यवस्थित आकार दिला नाही तर झाडांची उंची वाढते व शेवगा काढायला अवघड जातील शेवग्याची छाटणी :साधारणपणे लागवडीनंतर तीन ते चार महिन्यानंतर आणि झाडाची उंची ही तीन चार फूट झाल्यानंतर अर्धा ते एक फूट झाडाचा शेंडा छाटावा त्यामुळे झाडाची उंची ही मर्यादित राहतील व शेवगा पिकावर येणाऱ्या फांद्या 3 4 फुटाच्या खाली असल्याने शेंगा तोडायला एकदम सोपे जातेलागवडीपासून जवळपास सहा-सात महिन्यात शेवग्याच्या शेंगा तोडणी येतात पुढे तीन-चार महिने शेंगा पासून उत्पादन मिळते.
एक पिक झाले की झाडाची पुन्हा व्यवस्थितपणे छाटणी करून झाडास योग्य आकार द्यावा त्यासाठीच झाडाचा बुंधा तीन ते चार फूट ठेवायचा व फांद्या सर्वसाधारणपणे एक ते तीन फूट ठेवाव्यात पीकसंरक्षण :शेतकरी मित्रांनो शेवगा पिकावर ची रोगाचा प्रादुर्भाव जास्त करून दिसत नाही. पण कधी तरी जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये पानांची गळ होते खोडावर व फांद्यांवर ते ठिपके दिसतात व काही वेळा रोपे पिवळी पडून मरतात या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करावी किंवा बोर्डोमिश्रण (०.२५%) फवारावे.काढणी व उत्पादन :शेवग्याच्या उत्पादनाचा विचार केला तर सुमारे 6 7 महिन्यापासून शेंगा तोडणी येतात तर या शेंगा पूर्णपणे वाढ झालेल्या, ज्यांचा पीळ पुर्णपणे उघडला आहे अशा शेंगा तोडून लांबी नुसार जुळवून घ्याव्यात व पॅक कराव्यात . एका वर्षानंतर दरवर्षी चांगल्या झाडापासून सुमारे 25 ते 50 किलो शेंगा मिळतात .
From great farmers team .
Share your comments