1. कृषीपीडिया

शेतात करा स्ट्रॉबेरी ची लागवड, कमाई होईल लाखाच्या घरात

आपल्याला माहिती आहेच की स्ट्रॉबेरी ची लागवड आपल्या भारतात फार मोठ्या प्रमाणात केली जात आहे. स्ट्रॉबेरी हे प्रामुख्याने थंड हवामानात येणारे पीक आहे. पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळा भोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे. कारण फळाचे नाविण्य, या फळातील पोषणमूल्य आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर याला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना युरोप देशात निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. त्याचा वापर आईस्क्रीम, जॅम, जेली, साबण,धूप व सौंदर्यप्रसाधने इत्यादी मध्ये केला जातो. या लेखात आपण स्ट्रॉबेरी विषयी माहिती घेऊ.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
strawberry cultivation

 स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य काळ

 आपल्या भारताचा विचार केला तर स्ट्रॉबेरी लागवड सहसा सप्टेंबर मध्ये केली जाते. कारण हा काळ स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य मानला जातो. काबेरी ही कोणत्याही प्रकारच्या मातीत लावता येते. परंतु लाल मातीची उत्पादन जास्त येते. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी 15 ते 30 अंश सेंटिग्रेड  तापमान असणे आवश्यक आहे. तापमान जास्त असेल तर उत्पादनावर याचा परिणाम वाईट होतो.

 स्ट्रॉबेरीच्या प्रमुख जाती

 केम्रोजा, सेलवा, चान्डलर, रानिया, कॅलिफोर्निया, रजिया, विंटर डोन, स्वीट चार्ली इत्यादी स्ट्रॉबेरीच्या प्रमुख जाती आहेत.

 स्ट्रॉबेरीची लागवड कशी करावी?

 या पिकाची गादीवाफ्यावर 60 बाय 30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या 15 ते 20 सेंटिमीटर पर्यंतच्या थरातच वाढतात. स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी शिवा चार ओळी पद्धतीने सुद्धा केली जाते. त्यानुसार योग्य आकाराचे तयार करावेत. दोन ओळी पद्धतीसाठी 90 सेंटिमीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंची असलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपातील अंतर  30 सेंटिमीटर व दोन ओळींतील अंतर 60 सेंटिमीटर असावे. दोन ओळी पद्धतीत प्रति एकर 22 ते 25 हजार रोपे लागवडीसाठी लागतात. तीन ओळी पद्धतीसाठी 120 सेंटिमीटर रुंद व 30 ते 45 सेंटिमीटर उंची गादी वाफे करावेत. चार ओळी पद्धतीनेही लागवड होत असली तरी अंतर मशागत, फळ तोडणी, गादीवाफ्यात प्लास्टिक मल्चिंग करणे यामध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड सोयीस्कर ठरते.

 स्ट्रॉबेरीचे लागवडीनंतर नियोजन

 स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. जमिनीचा ओलावा लक्षात ठेवून वेळोवेळी शेताला पाणी देणे गरजेचे असते. स्ट्रॉबेरी मधून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी खताचे प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. स्ट्रॉबेरी मधील खतांचे प्रमाण हे स्ट्रॉबेरीचा  प्रकार आणि जमिनीचा पोत यावर अवलंबून असते. यासाठी वेळोवेळी कृषी विभागाचं आणि आपल्या परिसरातील कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. अवघ्या दीड महिन्यात लागवडीनंतर फळे येण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया पुढील चार महिने चालू राहते. स्ट्रॉबेरी ची तोडणी ही प्रामुख्याने फळाचा रंग अर्ध्यापेक्षा लाल झाला तरच ते फळ तोडले पाहिजे.

English Summary: strawberry cultivation Published on: 10 July 2021, 07:40 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters