1. कृषीपीडिया

पोट भरतय पण भुकच भागत नाय

कशी भागेल? तीन महिण्याचं पीक दोन महिन्यांत येतंय

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पोट भरतय  पण भुकच भागत नाय

पोट भरतय पण भुकच भागत नाय

कशी भागेल? तीन महिण्याचं पीक दोन महिन्यांत येतंय... निसर्गतःच परिपक्वता येण्यासाठी जो कालावधी लागतो तो तर द्यावाच लागेल ना? 

कशी भागेल? जमीणी तील अन्नद्रव्य वरती पीकांच्या मुळा जवळ सोडणारे गांडूळ आता वरती येतंच नाहीत...तर पीकामध्ये ते येणार कसे आणि खाणार्‍याला मिळणार कसे? 

कशी भागेल? फक्त हंगामानूसारच येणारी पीकं कोणत्याही हंगामात आनली जातायत... तर हवामानानुसार जे जीव पीकांच्या मुळा जवळ विविध औषधी मुलद्रव्य स्त्रवतात, पीकांना भरवतात ते मुलद्रव्य पीकांना मिळणार कोठून, आणि सहाजिकच खाणार्‍याला मिळणार कोठून? 

कशी भागेल? जे पीक रोगराईला सहज बळी पडतं ते औषध पाण्यावरती कसं तरी वाचवून तुमच्या ताटापर्यंत आनलं जातंय. जे स्वतःच औषधावरती जगलंय ते खाणार्‍याला औषधांशिवाय कसं जगता येईल? 

कशी भागेल? ज्यापीकात रोगराई पासून वाचवणारी स्वतःची रोग प्रतीकार शक्तीच नाही ती तुमची भुक कशी भागवेल... जे स्वतःच रोगराईला बळी पडतं ते खाणार्‍याला वाचवू शकेल? कोणत्या भ्रमात आहोत आपण? 

कशी भागेल? ज्या पीकाचं तुमच्या भौगोलिक परिस्थीतीशी कसलंही नातं नाही ते परदेशी पीक तुमच्या ताटापर्यंत येतंय, भुक कशी भागेल? निसर्गाने तुमच्या भौगोलिक परिस्थितीत पीढ्यांनपीढ्या जगणाऱ्यां जीवांमध्ये त्या परिस्थितीत जगण्याची अनूवंशीक क्षमता निर्माण केलेल्या असतात, जेंव्हा आपण ते खातो तेंव्हा आपण त्या परिस्थितीत जगण्यासाठी लागणार्‍या क्षमताच ग्रहण करत असतो.

जर खात असलेल्या अन्नातून आपली शरीराची गरज भागत नसेल तर भुक लागणारच.

निसर्गानं प्रत्येक भागात, प्रत्येक परिस्थितित प्रत्येक जीवाला जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते निर्माण केले आहे.

म्हणून आमच्या पुर्वजांनी गावरान भाज्या खाता याव्यात यासाठी गावानजीकची पाण्याची उपलब्धता असणारी जमीण अठरापगड जातीतील माळी समाजाकडे दिली...

गावरान म्हणजे ते, जे तुमच्या भौगोलिक परिस्थितीत, तुमच्या गावानजीक जे पीढ्यांनपीढ्या पीकत आलं. ज्यामध्ये त्या भौगोलीक परिस्थितित जगण्यासाठी गरजेचे बदल निसर्गतःच झालेले असतात.

आणि असे बदल निसर्ग सतत करत असतो.

म्हणून तर म्हणतो की, निसर्गाबरोबर चला. त्याची व्यवस्था समजून घ्या आणि त्याच्या व्यवस्थेत राहून निसर्गाला कसल्याही प्रकारचा अडथळा न आनता सुखासमाधानानं जगन्याची मानवी जीवन पद्धती शोधा आणि तीचा स्विकार करा.

नैसर्गीक खा... निरोगी रहा...

आरोग्य व्यवस्थित तर सगळंच व्यवस्थित, सगळंच म्हणजे सगळंच.

English Summary: Stomach full but not hungry Published on: 01 March 2022, 11:10 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters