सन २०१७/१८ मध्ये नाफेड अंतर्गत उडीद धान्याची खरेदी दि.चिखली जिनिंग प्रेसिंग संस्थेअंतर्गत करण्यात आली होती. काही शेतकऱ्यांना अजूनही सदर मालाची रक्कम मिळाली नसून जिनिंग प्रेसिंग कडून सदर शेतकऱ्यांना चेक देण्यात आले परंतु जिनिंग च्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याकारणाने चेक परत आले त्यामुळे सदर शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून कोरोना सारख्या महामारीत आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले.त्यामुळे सदर प्रकरणात चेक अनादर प्रकरणी जिनींग प्रेसिंगच्या अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून आठ दिवसाच्या आत सदर रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा शेतकर्यां समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलनाचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे
नितीन राजपूत यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिला आहे.
दि. 11 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात राजपूत यांनी नमुद केले आहे की , सन २०१७/१८ मध्ये नाफेड अंतर्गत उडीद धान्याची खरेदी दि.चिखली जिनिंग प्रेसिंग संस्थेअंतर्गत करण्यात आली होती. काही शेतकऱ्यांना अजूनही सदर मालाची रक्कम मिळाली नसून जिनिंग प्रेसिंग कडून सदर शेतकऱ्यांना चेक देण्यात आले होते मात्र सदर चेक निधीअभावी परत आल्याने शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. वारंवार जिनिंग प्रेसिंग तोंडी लेखी स्वरूपात पैशाची मागणी केली असता संस्थेकडे सध्या पैसे नाहीत पैसे आल्या नंतर देऊ अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आलेला आहे
त्यामुळे सदर प्रकरणी जिनींग प्रेसिंगच्या अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलनाचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नितीन राजपूत यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिला आहे. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा माझ्या जिवनाचे काही बरेवाईट झाल्यास याला चिखली जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष व सचिव तसेच सर्व संचालक मंडळ जबाबदार राहतील असेदेखील राजपूत यांनी निेवेदनात नमुद केले असून निवेदनाच्या प्रतिलीपी पालकमंत्री साहेब, बुलढाणा जिल्हा , स्वाभामानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, .जिल्हा उपनिबंधक ,
जिल्हा सहकारी संस्था, बुलढाणा , जिल्हा मार्केटिंग अधिकारी , बुलढाणा , जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा , पोलीस निरीक्षक , चिखली पोलीस स्टेशन .सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था चिखली यांना देण्यात आल्या आहेत.
हा पैसा गेला कुठे – नितीन राजपूत
यापुर्वी शेतकऱ्यांना नाफेड खरेदीचे पैसे देण्यासाठी कर्ज घेतले होते , त्यामध्ये काही कास्तकांरांना रक्कम अदा करण्यात आली. सदर कर्ज फेडण्यासाठी जिनींग प्रेसिंग जागेमध्ये बी ओटी तत्वावर व्यापारी गाळे बांधण्यात येत आहे त्यामागेसुध्दा मोठी माया जमविल्याची चर्चा आहे. इतके सगळे होऊनही अजुनही कास्तकांरांचे पैसे दिले नसल्याने सदर पैसा गेला कुठे याची चौकशी करण्यात यावी.
Share your comments