कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावं लागलं होतं. त्यामुळे आता अनेक जण स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करु लागले आहेत.अर्थात, व्यवसाय सुरु करायचा म्हटलं म्हणजे, भांडवल हवं पण घाबरु नका, ‘स्टार्ट अप इंडिया’ उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारही उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी मदतीचा हात देते.
रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा, ऑफिस, हॉस्पिटल आदी ठिकाणी एक वस्तू कायम पाहायला मिळते.. ती म्हणजे ‘टिश्यू पेपर’अर्थात नॅपकिन बाहेर असताना हात, तोंड स्वच्छ करण्यासाठी नेहमीच ‘टिश्यू पेपर’चा वापर केला जातो.
तुम्ही जर स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत असाल, तर ‘पेपर नॅपकिन्स’च्या बाराही महिने चालणाऱ्या व्यवसायात नशीब आजमावू शकता. ‘पेपर नॅपकिन्स’ बनवण्यासाठी ‘मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट’ करून लाखो रुपये कमावू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो, त्याद्वारे किती कमाई होते, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
‘पेपर नॅपकिन्स’ व्यवसायाबाबत.
‘पेपर नॅपकिन’ अर्थात ‘टिश्यू पेपर’चा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्या खिशात फक्त साडे तीन लाख रुपये हवेत. या पैशांची व्यवस्था झाल्यानंतर तुम्ही केंद्र सरकारच्या ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता.
टिश्यू पेपर’चे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी तुमच्याकडे 3.50 लाख रुपये असल्यास बँकेकडून तुम्हाला सुमारे 3.10 लाख रुपये ‘टर्म लोन’ (Term loan) शिवाय 5.30 लाखांपर्यंत ‘वर्किंग कॅपिटल लोन’ (Working capital loan) मिळते.
कर्जासाठी असा करा अर्ज.
प्रधानमंत्री मुद्रा (MUDRA) योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जासाठी कोणत्याही बँकेत अर्ज करता येतो. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात तुमचे नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, सध्याचे इन्कम नि किती लोन लागेल, याची माहिती द्यावी लागेल.. विशेष म्हणजे, या लोनसाठी तुम्हाला कोणतीही ‘प्रोसेसिंग फी’ किंवा ‘गॅरेंटी फी’ भरावी लागणार नाही. कर्जाची रक्कम तुम्ही हप्त्यांमध्ये फेडू शकता.
कमाई किती होणार?
समजा, तुम्ही एक वर्षभरात 1.50 लाख किलो ‘पेपर नॅपकिन्स’ तयार केले, तर तर सुमारे 65 रुपये किलो दराने त्याची विक्री होते. एका वर्षात तुमची उलाढाल असेल, सुमारे 97.50 लाख रुपयांची. त्यातून सगळा खर्च वजा जाता वर्षाला तुमच्या खिशात सुमारे 10-12 लाख रुपये राहू शकतात.
दरम्यान, तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल, तसा हा नफा वाढत जाईल.. शिवाय, तुम्ही नोकरदार न राहता, नोकरी देणारे व्हाल हे नक्की!
Share your comments