भारतात अनेक शेतकरी फळबाग लागवड करतात, फळबागात द्राक्षच्या बागा (Vineyards) देशात सर्वत्र नजरेला पडतात. देशात द्राक्ष लागवड जवळपास चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर केली जाते. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यात द्राक्ष लागवड नजरेला पडते. राज्यात देखील द्राक्ष लागवड (Grape Farming) लक्षणीय बघायला मिळते. नाशिक जिल्हा (Nashik District) द्राक्ष उत्पादनात संपूर्ण देशात अव्वल स्थानी आहे. म्हणुन नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी म्हणून ओळखले जाते.
येथील बहुतांश शेतकरी केवळ द्राक्ष पिकावर अवलंबून असतात. द्राक्षाची मागणी ही लक्षणीय असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Growers) द्राक्ष पिकातून चांगली तगडी कमाई करताना दिसत आहेत. आज आपणदेशात उगवल्या जाणाऱ्या प्रमुख द्राक्षाच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनोवेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
भारतात लागवड केल्या जाणार्या प्रमुख द्राक्षांच्या जाती (Grape Varieties Cultivated in India)
थॉम्पसन सीडलेस
थॉम्पसन सीडलेस ही भारतात उगवणारी जाणारी द्राक्षाची प्रमुख जात आहे. ही एक सुधारित द्राक्षाची वाण (Improved grape varieties) आहे. ह्या जातीची द्राक्ष हलकी हिरवी अंडाकृती आकाराची असतात. थॉम्पसन सीडलेस ह्या द्राक्षाच्या जातीची लागवड उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते.
बंगलोर ब्लू ग्रेप्स
भारतात बँगलूर ब्लु ग्रेप्स ही सर्वात जास्त लागवड केली जाणाऱ्या द्राक्षाच्या यादीत दुसऱ्या स्थानी येते. थॉम्पसन सीडलेस ह्या जाती समवेतच बंगलोर ब्लू द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खुप प्रसिद्ध आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यात या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. म्हणूनच या जातीला बेंगलोर ब्लू ग्रेप्स असे संबोधले जाते. या जातीचा प्रामुख्याने जॅम आणि जेली बनवण्यासाठी उपयोग केला जातो. या जातींचे द्राक्ष निळ्या रंगाची असतात या द्राक्षांना त्यांच्या चवीमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.
अनब-ए-शाही
अनब-ए-शाही ही देखील एक द्राक्षची सुधारित जात (Improved varieties of grapes) आहे. या जातीची द्राक्षे कच्चीच सेवन केली जातात तसेच या जातीच्या द्राक्षचे रस करून देखील मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. अनब-ए-शाही द्राक्षे भारतातील आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा इत्यादी राज्यांमध्ये लावली जातात. या फळाच्या बिया आणि सालीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे मानवी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. द्राक्षांचा आकार लंबआकार असून बिया पांढर्या रंगाच्या असतात.
Share your comments