1. कृषीपीडिया

Stacking Method: भाजीपाल्याचे कमी नुकसान व्हावे यासाठी उपयुक्त आहे स्टॅकिंग पद्धत

सध्या शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत.नव्या पद्धतीने पिकांची लागवड केली जात असल्यानेउत्पन्नात वाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी भाज्यांचे उत्पादन घेताना नवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. आज आपण अशाच एका पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
stacking method

stacking method

सध्या शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत.नव्या पद्धतीने पिकांची लागवड केली जात असल्यानेउत्पन्नात वाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी भाज्यांचे उत्पादन घेताना नवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. आज आपण अशाच एका पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत.

जर कुणी शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत असतील तर ही पद्धत नक्कीच वापरली पाहिजे. या पद्धतीला म्हणतात स्टॅकिंग पद्धत. ही पद्धत वापरून  उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते.स्टॅकिंग हे नाव जरी इंग्रजी असले तरी ही पद्धत पूर्णपणे देशी आहे.

नेमकी काय आहे स्टॅकिंग पद्धत?

  या पद्धतीत बांबूचा वापर करून वायर आणि दोरी चे जाळे तयार केले जाते. यावर वनस्पतींच्या वेली पसरवल्या जातात. या पद्धतीचा अवलंब शेतकरी वांगी,टोमॅटो,मिरची सह भोपळ्याची लागवड साठी करू शकतात. बऱ्याच गावातील शेतकरी स्टॅकिंग पद्धतीने शेती यशस्वीरित्या करत आहेत. या पद्धतीमुळे पिके  सुरक्षित राहतात. त्यामुळे भाजीपाला पिकांना चांगला भाव मिळतो.

स्टॅकिंग पद्धत अवलंबण्याची पद्धत

 तरी शेतकऱ्यांना या पद्धतीने भाज्यांची लागवड करायची असेल तर प्रथम बांबूचे दहा फूट उंच खांबदहा फुटाच्या अंतरावर बांधाला गाडावेत. त्यानंतर काठ्यावर 2 फूट उंचीवर तार बांधावी.त्यानंतर वेलींना किंवा झाडांनासुतळी च्या मदतीने त्या तारांना बांधून घ्याव्यात. जेणेकरून वेलीकिंवा झाडेत्या बाजूने वाढतील. याप्रमाणे झाडाची उंची आठ फूट होत असते आणि त्यानंतर झाडे मजबूत होत उत्पन्नअधिक देत असतात.

स्टॅकिंग पद्धतीचा फायदा

या पिकांच्या झाडांना आधार मिळाल्याने हे झाडे खाली वाकत नाही.यामुळे पद्धतीच्या मदतीने टोमॅटो,वांगे, मिरची सडण्यापासून वाचू शकते.वेली फळ भाज्यांचा अधिक भार सहन करू शकत नाही.त्यामुळे या पद्धतीमुळे वेलींना आधार मिळतो. जर फळ भाज्या खाली बोलावण्यात पडून राहतील, जमिनीवर लोळल्यामुळे तर त्या सडून जात असतात. परंतु या पद्धतीमुळे धोका टळतो.यासह फळ भाज्यांचा वजनामुळे झाडे वेली तुटून जात नाहीत.

English Summary: stacking method is useful foe vegetable crop for more production Published on: 19 December 2021, 02:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters