शेतातील कच्च्या मालाची लूट होऊन शेतकरी हा आत्महत्येकडे कसा गेला, ही माहिती सांगणार ज्ञानपीठ म्हणजे शेतकरी संघटना. या चळवळीने गेली चाळीस वर्ष महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या होणाऱ्याआर्थिक शोषणाची माहिती शेतकऱ्यांसमोर मांडली. शेतीच्याच लुटीतून शहरीकरण वाढत गेले .आणि शेतकरी योद्ध्याला जगाचा पोशिंदा म्हणूनच सत्ताधीशांनी कसे मातीत घातले, व शेतकऱ्यांची किंमत ही कशी कवडीमोल केली. ही परिस्थिती संपूर्ण भारताने आता पाहिलेली आहे. या जागतिक व आर्थिक धोरणाची माहिती ही महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलीआहे.मान. शरद जोशी यांनी आर्थिक शास्त्राचे धोरण हे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व अडाणी शेतकऱ्याला जास्तीत जास्त सोप्या भाषेत समजून सांगितले. एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरी व त्याचा सर्वात मोठा उत्पन्नाचा शेती हा कारखाना होता . व पेरणीचं योग्य वेळ साधून वातावरणाच्या अनेक संकटात तो आपली शेती उभी करत राहिला . शेतकरी हा कधीच अडानी नव्हता त्याला सत्तेतील पक्षांतील लोकांनी, राज्यकर्त्यांनी जाणून बुजून अडानी ठेवला.
समाजातील बरीच लोकांचे मतांतर अशी आहेत की ,जे शेतकरी संघटना सोडून गेलेले नेतेआहेत, हे ज्या राजकीय पक्षातगेले आहेत .ते समाजाला धोका देऊन गेलीत .असा लोकांचा गैरसमज आहे. पण मला असं वाटते की, त्यांनी त्यांची समाजसेवेची कारकीर्द पूर्ण
केलेंली आहे. तारुण्यापासून आयुष्याची राखरांगोळी करून ते शेतकरी समाजासाठीआतापर्यंत जगले. शेतकरी विरोधी कायदे हाणून पाडण्यासाठी व ते शेतकरी हिताचे करण्यासाठी त्यांना विधान भवन व संसद मध्ये जनतेने पाठविणे गरजेचे होते?. समाजाने त्यांना निवडून न दिल्यामुळे, ते इतर राजकीय पक्षात
नाईलाजानेच सामील झाले. त्यांची राजकीय इच्छा शक्ती ही सर्व शेतकरी समाजाच्याखरोखरच कामाची होती. ती समाजाने ओळखले नाही,त्यात दिरंगाई झाली.तर तो शेतकरी समाजाचा सर्वात मोठा दोष म्हणावा लागेल ? ज्या शेतकऱ्यांनाच आपले शेतकरी विरोधी कायदे दुरुस्त करून घ्यायचे नाही, व स्वतःच राजकीय पक्षांच्या लाचार व गुलामीत जगायचे आहे . ज्या राजकीय पक्षांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या थोबाडीत हाणली, त्यांच्यावरच जर आपण आज पर्यंत विश्वास ठेवून जगत राहिलो .
तर शेतकरी संघटनेचे नेते इतर पक्षात गेले म्हणून त्यांना दोष द्यायचं हे कितपत योग्य आहे? आपण पाहतो दररोज राजकीय पक्षांचे नेते सकाळ-दुपार-संध्याकाळ राजकीय पक्ष सोडून इतरत्र जात आहेत. त्याची या समाजाला कधीच लाज वाटली नाही. व आमदार-खासदार, मंत्र्याला याच शेतकरी समाजानेकधी झोडपले सुध्धा नाही. त्यांची खरडपट्टी काढली नाही. उलट राजकीय पक्षा चा लाचार व गुलाम होऊन शेतकरी नेत्याला हाच शेतकरी स्टेजवर जाऊन हार अर्पण करण्यास धजावत आहे . कारण या शेतकर्यांला स्वतःच्या दुःखाचे कारणच कधी कळले नाही, राजकीय पक्षांनी तर त्याला कळू सुध्धा दिले नाही. आणि हा अस्मानी व सुलतानी संकट अशीच सामना देत राहिला. व हा शेतकरी, दुखी मनाचा माणूस, स्वतःच्या मनाशीच आयुष्यभर बोलत राहिला.
जैसे ठेविले अनंते, तैसेचि रहावे
शेतकरी संघटनेचे नेते कोणत्याही राजकीय पक्षात जरी गेलेअसेल तरी ते परिपक्व विचाराचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या परीने, तेथे जाऊन दुरुस्ती करण्याचाच प्रयत्न केला. परंतु आजचे आमदार, खासदार हे राजकीय पक्षाच्या ताब्यात असल्यामुळे संघटनेचा शेतकरी नेता हा एकटा माणूस कायदे दुरुस्त करू शकणार नाही?. कारण कायदे बदलण्यासाठी, व ते शेतकरी हिताचे करण्यासाठी आमदार-खासदारांचे त्यांना संख्याबळ व आधार असणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे आता शेतकऱ्यांना चांगले समजले आहे.
शेतकऱ्यांनी अनेक राजकीय पक्षाचे अध्यक्ष ,बँकेचे अध्यक्ष , A.p.M.C चे director आमदार ,खासदार, मंत्री करून , सर्वच राजकीय पक्षांच्या चोरांच्या हाती चावी दिली आहे.परंतु आर्थिक संकटाची व दुःखाची कुराड स्वतःच्याच डोक्यावर मारून घेतली आहे .स्वतःच आपले हातपाय तोडून घेतलेआहे.समाजाने जर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना, बहुसंख्येने निवडून दिले असते तर आज संघटनेच्या नेत्यांना सुद्धा इतर राजकीय पक्षात जाण्याचे काही कारणच नव्हते. शेतकरी समाजानेच शेतकरी संघटनेच्या व्यक्तींना भरघोस मतांनी, व जास्त संख्येने जर आमदार, विधानभवनात व संसद मध्ये खासदार निवडून पाठवले असते तर, शेतकरी हिताचे स्वतंत्र कायदेआतापर्यंत तयार झाले असते. शेतकऱ्यांचे दुःख वाढत गेले नसते व शेतकरी आत्महत्येचा कलंक सुद्धा भारत देशाला लागला नसता ?
आम्ही गेल्या चाळीस वर्षाच्या अगोदर शेतकरी संघटनेच्या प्रचारासाठी जेव्हा गावोगावी फिरत होतो. तेव्हा फक्त घरा समोरच्याच बैठकी बांधल्या होत्या. बाकी वाडा ,व सर्वमागील घर मोडकळीस व पडित होते. मात्र आज शेतकरी आंदोलनाच्या दबावामुळे राजकीय पक्ष हतबल व्हायला लागले व त्यांनी शेतकऱ्यांसाठी तिजोरी थोडीफार मोकळी केली. आज थोडेफार शेतीमालाचे भाव व्यवस्थित होत चालले आहे. त्यामुळे अनेकांची खेड्यातील घरांची दुरुस्ती झाली, दोन पैसे शेतकऱ्यांच्या घरात कर्जमाफी मुळे आले. शेतकरी शेतकऱ्यांना म्हणायचे कर्ज फिटत नाही तर कशाला घेतले. सन 1980 च्या काळात, शासनाचे कर्मचारी, बँकेचे अधिकारी शेतकरी वर्गावर दबाव टाकून त्यांचे टीन ,टीव्ही व घरातील इतर साहित्य,जप्त करत होती. व हेच बँकेचे अधिकारी शेतकरी समाजाचे धिंडवडे इतर जनतेसमोर दाखवत होती. शेतकरी हा शेतात जाऊन लपत होता.
युवा शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या आश्रयाला धावली शेतकऱ्यांची होणारी बेअब्रू या शेतकरी आंदोलनामुळे थांबली. तेव्हा याच सत्तेतील राजकीय पक्षांना शेतकऱ्यांची बेअब्रू होत आहे हे समजल नव्हत काय? पण आपल्या जातीचे व नात्यागोत्याचे वडिलोपार्जित खानदानी चे नेते आपणच निवडून पाठविले होते?. मग आपल्या जातीधर्माच्या व आपल्याच ओळखीच्या आमदार नेत्यांनी आपली बेअब्रू का केली? आपला जाती-धर्मांच्या व शेतकरी मित्राची कशी लाज बाहेर चव्हाट्यावर आणली? हे त्यावेळेस त्याला समजले नव्हते काय? जसे बँकेचे अधिकाऱ्याला पीटाळून तुम्ही गावाच्या बाहेर शेतकरी संघटनेने हाकलले होते,. तसेच या नेत्यांना, आमदार-खासदार, मंत्र्यांना हाकलण्याची हिम्मत हाच शेतकरी समाज दाखवील काय?. आपल्या रूमण्या चा हिसका दाखविल काय?
शेतकरी आंदोलनाच्या आक्रोशामुळे या देशातील सर्वच राजकीय पक्षआता वठणीवर आले आहेत. महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यासाठी चांदवडला महिला अधिवेशन घेऊन लाखो महिला जमा करून, संपूर्ण देशात महिलांच्या दुःखांची वाचा व पहिली मांडणी ही शरद जोशी यांनी केली. म्हणूनच शासनाने ती मान्य करून महिलांना सत्तेत राजकीय आरक्षण मिळाले.आता जरी सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा जयघोष करायला निघाले असले तरी, त्यांचे खाण्याचे दात वेगळे आहेत,वागण्याचे दात वेगळे आहेत , तर ते शेतकरी हिताचे अजूनही नाही.शेतकऱ्यांच्या आर्थिक धोरणाचा विचार या देशात जो वाढायला लागला आहे तर ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मान. शरद जोशी यांच्या तत्त्वज्ञाना मुळे ही सर्वपरिस्थिती बदललेली दिसत आहे. आज शेतकऱ्यांचा दबाव हा शासनावर चौफेर वाढत आहे. म्हणूनच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका थोडीफार बदलेली दिसत आहे, तर ती कोणत्याही राजकीय पक्षाचे स्वखुशीने नाही. तर ती शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे , व दबावा मुले दिसत आहे. त्याच वेळेस सत्तेतले राजकीय पक्षांनी स्वखुशीने हे जर दिल असते तर आंदोलने, मोर्चे ,अश्रुधुराच्या नळकांड्या ,गोळीबार, अमानुष मार, कशाला सहन करावा लागला असता ?. तर ते कशाला कैदेत गेले असते.
जेव्हा शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली तेव्हा त्यांनी राजकीय पक्षाच्या विरुद्ध आवाज उठविणे चालू केले. व आंदोलनाचे अधिकार शेतकरी संघटनेने अहिंसेच्या मार्गाने मिळून घेतले. अजून राजकीय पक्षाच्या गटारात जाऊन फसले, मात्र पुढे आता आंदोलनामुळे हे शक्यहोणार नाही, तर ते विधान भवन व संसद मध्ये आमदार ,खासदार निवडून पाठवने , व शेतकरी हिताचे कायदे करणेआज गरजेचे आहे
गावा गावात जाऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी गोष्टी करणारे व दुटप्पी धोरणाचे शेतकरी नेते हे मुंबईत ,दिल्लीत जाऊन त्याच राजकीय पक्षाचे पाय चाटत होते. हे सर्व समाजाने गेल्या सत्तर वर्षात बघितले आहे. व वापस गावात येऊन शेतकरी, शेतमजूरा ला बेवखुप बनवित आहेत. सत्तेतून पैसा व पैशातून सत्तेचा खेळ हाच आजच्या राजकीय पक्षांनी चालविला तमाशा आहे. मी किती निधी तुमच्या गावासाठी आणला. जसे या नेत्याने आपलं घरूनच आणून वाटप केले. मात्र त्या निधीत किती डल्ला मारला हे कधीच सांगितले नाही.
शेतकरी समाजाने राजकीय पक्षाच्या आपल्या डोक्यावर बांधलेल्या पट्ट्या जर अजूनही सोडविल्या नाही तर, पुढील काळात शेतकऱ्यांची मुले आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही? शरद जोशी चाळीस वर्षाच्या अगोदर सांगत होते...... शेतीमालाला भाव मिळाला नाही तर , एक दिवस शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही . हे आज सर्व खरंच झालेले आहे. कारण लोकसंख्या वाढत असल्यामुळे शेतीची व्याप्ती कमी होत चाललेली आहे . महामारी मुळे शहरीकरणा चे जीवन धोक्यात आले आहे. मात्र जगण्याची अपेक्षा ह्या औद्योगिकीकरणाचा विकास केल्यामुळे खूप भरमसाठ वाढल्या आहेत.त्यामुळे पुढील येणारा पैसा हा फक्त शेतीमालाच्या भावातुनचं शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या हातात येऊ शकतो ?,आणि म्हणूनच शेतीमालाला रास्त भाव मिळाल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकणार नाही. गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी संघटनेच्या आंदोलनात ज्यांनी आपले योगदान दिले ते अनेक ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते आता कमी कमी होत चाललेली आहे. वयोमानाने त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. आणि जागतिक धोरणाचा, आर्थिक धोरणाचा अभ्यास नवीन शेतकरी वर्गातल्या मुलांना करणे कठीण होत चालले आहे. तरुण शेतकरी पुत्रांनी जय भवानी जय शिवाजी म्हणून आता चालणार नाही. तर त्यांना जागतिक धोरणाचा अभ्यासच करावा लागेल.
शिल्लक राहिलेली शेतकरी संघटनेची निष्ठावान मंडळी जर संपली तर त्याचा दोष हा फक्त आणि फक्त शेतकरी समाजावरच राहणार आहे. आता जी काही मंडळी शेतकरी संघटनेची गावोगावी शिल्लक असतील त्यांना कृपा करून संपवण्याची आणि डीवचन्याचे काम जरी या शेतकरी समाजाने केले नाही तरी भरपूर झाले. कारण शेतकरी समाजाला दुरुस्त करण्याची अवकात या देशातील कोणत्याच राजकीय पक्षात नाही? या लोकशाही तील गावगुंडात, व दरोडेखोरात तर नक्कीच नाही. त्यासाठी आता शेतकरी संघटनेची धुरा संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कैवारी मान. रघुनाथदादा पाटील खांद्यावर झेंडा घेऊन राबवित आहे. शेतकरी समाजाला शेतकरी संघटनेच्या झेंड्याखालीच एकत्र येणे ही आगामी काळाची गरज आहे. ती त्यांनी जर ही काळाची पावले ओळखली नाही तर त्याचे परिणाम सर्व शेतकरी समाज भोगल्याशिवाय राहणार नाही . जय बळीराजा.
ही नम्र विनंती.
१) ना जात, ना पात, ना प्रांत, ना पक्ष,l
किसान बचाव एकही लक्ष. Il
२) काँग्रेस, बीजेपी हटाव, भारत देश बचाओ l
भारत देश का किसान बचाओ.ll
३) 18-6, 1951 ला तयार झालेले कायदे हे शेतकरी हिताचे नाहीत. परिशिष्ट 9 मध्ये बदल करणे गरजेचेआहे.
आपला नम्र!
धनंजय काकडे पाटील
विदर्भ प्रमुख, शेतकरी संघटना. 9356783415.
Share your comments