1. कृषीपीडिया

महत्वाचे! फवारणी करतांना ही काळजी घ्या नाहीतर होणार पिकाचे आणि तुमचे नुकसान

भारत हा एक शेतीप्रधान देश आहे भारताची अर्थव्यवस्था हे पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हटले की कीटकनाशक फवारणी यांचा समावेश आलाच. पिकांच्या अधिक उत्पादनासाठी तसेच रोगांपासून बचाव करण्यासाठी पिकांना विविध प्रकारची कीटकनाशके बुरशीनाशके कवकनाशके इत्यादीची फवारणी ही करावीच लागते. अनेक कीटकनाशके ही डेंजर्स असतात, त्यामुळे फवारणी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. चुकीच्या पद्धतीने फवारणी केली गेली तर पिकाचे तसेच आपले सुद्धा नुकसान होऊ शकते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pesticide

pesticide

कीटकनाशक फवारताना थोडीशी जरी असावधानता बाळगली तरीसुद्धा ते महागात पडू शकते. म्हणून आज आपण आपला शेतकरी वाचक मित्रांसाठी फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो फवारणी करताना निष्काळजीपणे वागून चालणार नाही यामुळे आपले व आपल्या सोन्यासारखे पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.

कीटकनाशक निवडताना घ्यायची काळजी

  • शेतकरी मित्रांनो जर आपल्या पिकावर कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यासाठी त्या किडीची ओळख असणे महत्त्वाचे ठरते, जर कीड ओळखणे शक्य नसेल तर त्यासाठी आपण अनुभवी शेतकऱ्यांचा अथवा कृषी वैज्ञानिकांचा सल्ला घेऊ शकता. आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण कीटकनाशकांची देखील निवड करावी त्यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही तसेच आपला वेळ व पैसा हादेखील वाचेल.
  • शेतकरी मित्रांनो किडीचा पिकावर लगेच प्रादुर्भाव दिसतात फवारणी करणे टाळावे फवारणी शक्‍यतो जेव्हा पिकाचे नुकसान हे हे मर्यादेपेक्षा अधिक असेल तेव्हाच करावी. त्यामुळे अवाजवी खर्च हा टाळता येऊ शकतो त्यामुळे पिकाला येणारा खर्च हा कमी होईल व उत्पादनात थोडी का होईना वाढ होईल.
  • शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे कीटकनाशकांच्या पॉकेट वर लाल हिरवे पिवळे असे चिन्हे बनवलेली असतात, हे चिन्हे त्या कीटकनाशकांची विषारीता दाखवत असतात त्यामुळे शक्यतो लाल चिन्हे असलेले कीटकनाशके खरेदी करू नये, कारण की कीटकनाशके सर्वात जास्त खतरनाक ही माणसासाठीच असल्याचे सांगितले जाते.
  • शेतकरी मित्रांनो कीटकनाशक खरेदी करताना एक्सपायरी डेट बघूनच खरेदी करणे आवश्यक आहे. कारण की जुने किंवा एक्सपायर झालेले औषध हे पाहिजे तेवढे प्रभावीरीत्या कार्य करत नाही त्यामुळे आपला पैसा हा वाया जाऊ शकतो.
  • शेतकरी मित्रांनो आपणास माहितच असेल की प्रत्येक कीटकनाशकाची सोबत त्याला वापरण्याची पद्धत ही नमूद केलेली असते या वापरण्याच्या पद्धतीनुसारच कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • शेतकरी मित्रांनो कीटकनाशके हे नेहमी स्वच्छ हवेशीर व कोरड्या ठिकाणी ठेवली पाहिजेत तसेच कीटकनाशके हे आपल्या घरातील लहान मुलांच्या सहवासात येणार नाहीत याची खातरजमा देखील केली गेली पाहिजे नाहीतर यामुळे मोठी हानी होऊ शकते.
  • तसेच कीटकनाशक फवारणी करताना निदान एक वेळेस कृषी वैज्ञानिकांचा किंवा अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेणे अनिवार्य ठरते. यामुळे आपला वेळ श्रम पैसा वाचतो तसेच होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
English Summary: spray pesticides with care know moore about this Published on: 19 December 2021, 08:40 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters