1. कृषीपीडिया

शेतकरी मित्रांनो पालक लागवड (Spinach Farming) ठरेलं फायदेशीर ; जाणुन घ्या पालक लागवडिविषयी

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
spinach cultivation

spinach cultivation

भाजीपाल्यामध्ये जीवनसत्वे भरपुर प्रमाणात आढळतात. शरीरासाठी हिरवा भाजीपाला खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला नेहमी देत असतात. पालक ही पण एक महत्वाची हिरवी पालेभाजी आहे पालकचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. पालक मध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे ती शरीरासाठी खुप पौष्टिक असते. पालकची भाजी सात्विक आहारात एक महत्वाचे स्थान ठेवते. पालक अनेक प्रकारे लोक सेवन करतात. पालकची भाजी बटाट्यात मिक्स करून भाजी करता येते. पालक ही तशीच म्हणजे कच्चे सलाद म्हणून देखील खाल्ले जाऊ शकते. पालकची कढी सुद्धा बनवली जाते.

पालकची भज्जी बनवली जाते आणि ही खुप चविष्ट लागते. अनेक उपहारगृहात पालकचा रायता खायला दिला जातो. पालक पनीर, पालक पराठा, अशा अनेक डिशेष उपहारगृहात भेटतात त्यामध्ये पालक हा महत्वाचा असतो. खान्देश प्रांतात शेपू सोबत पालक मिक्स करून भाजी बनवली जाते आणि जवळपास सर्वच जन इकडे फक्त पालक खात नाहीत तर त्यासोबत शेपू टाकून भाजी बनवतात. ह्यामुळे पालकची लागवड ही शेतकऱ्यांना नक्कीच चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते. पालकची मागणी ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पालकला दाम पण चांगला मिळू शकतो. पालकमध्ये लोह जास्त असल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डॉक्टर रुग्णाला पालक किंवा गाजर खाण्याचा सल्ला देतात. पालकची लागवड ही घरच्या पारसबागेतही करता येऊ शकते आणि शेतातपण ह्याची लागवड केली जाऊ शकते.  बहुतेक शेतकरी इतर भाजीपाला पिकांसह पालकची लागवड करणे पसंत करतात.

पालक च्या सुधारित जाती

भारतात प्रामुख्याने दोन प्रकारचे पालकची लागवड केली जाते, गावठी आणि विदेशी, हायब्रीड. शेतकरी त्यांच्या प्रदेशानुसार देशी आणि आणि इतर हायब्रीड जाती निवडू शकतात. भारतात पालकचे उच्च उत्पन्न देणारे वाण ऑल ग्रीन, पुसा हरित, पुसा ज्योती, बॅनर्जी जायंट, जॉबनर ग्रीन ह्या आहेत.

पालक लागवडीसाठी आवश्यक हवामान कसं असावं बरं?

पालक लागवडीसाठी थंड हवामान मानवते असे सांगितले जाते. पालकची पाने हिवाळ्यात जास्त वाढतात. तापमान वाढल्यावर पालकची वाढ खुंटते. त्यामुळे हिवाळ्यात पालक लागवड करणे चांगले, यामुळे पालकचे उत्पादन चांगले मिळू शकते. परंतु ते मध्यम हवामान असलेल्या प्रदेशात वर्षभर घेतले जाऊ शकते.

 पालक लागवड केव्हा केली पाहिजे

तस बघायला गेले तर, पालकची लागवड ज्या ठिकाणी मध्यम हवामान असते त्या ठिकाणी बारामाही केले जाऊ शकते. परंतु ज्याठिकाणी वातावरणात नेहमी बदल होतो त्या ठिकाणी पालकच्या लागवडीसाठी सर्वोत्तम महिना म्हणजे डिसेंबर.

पालक लागवडीतून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लागवड करता येते, ज्यामुळे चांगले उत्पादन मिळते.

 पालक लागवडीसाठी जमीनकशी असावी बरं?

पालक लागवडीसाठी जमीन ही लोममाती (वाळू, गाळ आणि थोड्या प्रमाणात चिकनमाती याचे मिळून बनलेली) असलेली असावी. जमिनीचा पीएच हा 6 ते 7 दरम्यान म्हणजेच मध्यम असावा. जमीन ही चांगला पाण्याचा निचरा होणारी असावी ज्यामुळे उत्पादन चांगले येते.

 

 

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters