अप्रभावी पद्धतीने तण नियंत्रण हे सोयाबीन उत्पादनात घट होण्याशी संबंधित मुख्य घटकांपैकी एक आहे. खरीप हंगामात महाराष्ट्रात सोयाबिनची जवळ जवळ ४३ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असून विदर्भात एकूण लागवड क्षेत्राच्या ४०-४५ टक्के क्षेत्रावर हे पिक घेतले जाते. खरीप हंगामात शेतात वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे पिकानां अन्नद्रवे आणि पाण्याची कमतरता भासते. तसेच तणांची पिकांबरोबर हवा, जागा व सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत स्पर्धा होते. ही स्पर्धा प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात (पेरणीनंतर १५-४५ दिवसांपर्यंत) महत्त्वाची असते, उत्पादनातील संभाव्य नुकसानीमुळे जे ४०-५३% पर्यंत असू शकते. वरील कालावधीनंतर पीक जरी तणमुक्त ठेवले तरी उत्पादनात झालेली घट भरून येऊ शकत नाही.
यामुळे पिकांच्या संवेदनक्षम कालावधीनुसार योग्य वेळी व पद्धतीने तणव्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पीकांचे उत्पादन कमी करण्याव्यतिरिक्त, तणांमुळे इतर समस्या उद्भवू शकतात, जसे की धान्याची गुणवत्ता कमी करणे, काढणी दरम्यान अडचण निर्माण करणे आणि कीटक आणि रोगांचे पर्यायी आधार वनस्पती म्हणून काम करणे. सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगांसाठी पर्यायी आधार वनस्पती म्हणून तणांची भूमिका आणि त्यांचा लागवडीतील हस्तक्षेप यामुळे उत्पादन खर्च जास्त होतो.यावर एकात्मीक तणव्यवस्थापन अमलात आणल्यास तणांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. शेताची उत्तम मशागत, संतुलित खतांचा वापर, वाणाची निवड, पेरणीची वेळ, रोपांची निर्धारित संख्या,
डवरणी, निंदन आणि पीक फेरपालट यासारख्या मशागतीय पद्धती पीक वाढीला फायदा होण्यासाठी केल्या पाहिजेत ह्या बाबी कटाक्शाने पाळल्या गेल्या तर अपेक्षित दर्ज्याचे तण नियंत्रण शक्य होते. एकात्मिक तण व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना तणनाशकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि तणनाशक-प्रतिरोधक झाडांची निर्मिती थांबवावी करिता एकात्मीक तणव्यवस्थापन पद्धतिचा दृष्टिकोन प्रेरित झाला.रासायनिक तणनाशकाचा अंश व्यास्थापना संबंधी उपाय योजना तणनाशकाचा अति वापरामुळे भविष्यात तान्नाशाकाचा अंश वाधीच्चा धोका लक्ष्यात घेता जमिनीमध्ये असे अंश वाढू नये यासाठी खालील उपाय योजना कराव्यात.
शिफारशीच्या मात्रेतच तणनाशकाचा वापर करावा. एकच एक तणनाशकाचा वापर टाळावा.l एक पिक न घेता पिकांची फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो. सेंद्रियखताचा हेक्टरी १० ते १५ टन वापर केल्यास जमिनीतील तण नाशकांचे अंश धरून ठवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुद्धा वाढते.जमिनीची खोल नांगरटी केल्यास जमिनीच्या थराची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा माशागतीमुळे खोल जातो आणि तण नाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.
डॉ.विकास गौड, कृषि विद्यावेत्ता, अ.भा. स. तणव्यवस्थापन प्रकल्प, प्रकाश घाटोळ, विस्तार कृषि विद्यावेत्ता,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
Share your comments