केंद्र सरकारने खरिप हंगाम २०२२-२३ मधील उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. केंद्राने यंदा देशात १२९ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज मागील उत्पादनाच्या तुलनेत एक लाख टनांनी कमी आहे.देशातील सोयाबीन लागवड यंदा ८ हजार हेक्टरनं कमी झाली. आत्तापर्यंत १२० लाख ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालाय. तर मागील हंगामात १२० लाख ७८ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. हंगामाच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं यंदा
देशात १४७ लाख टन सोयाबीन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं होतं.A target of 147 lakh tonnes of soybean production was set in the country.तर सरकारच्या मागील वर्षाच्या चौथ्या अंदाजानुसार जवळपास १३० लाख टन सोयाबीन उत्पादन झालं.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कसे राहतील समोरचे दिवस वाचा
आता सरकारनं २०२२-२३ च्या हंगामातील म्हणजेच चालू हंगामातील खरिप उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केलाय.पहिल्या अंदाजात सरकारनं यंदा देशात १२९ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असं म्हटलंय. म्हणजेच सुरुवातीलाच सरकारनं गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीन उत्पादन एक लाख टनानं कमी राहीलं, असं जाहीर केलंय. मागील वर्षी सरकारनं पहिल्या
अंदाजात १२७ लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता.त्यानंतर मात्र त्यात वाढ करत १३० लाख टनांर्यंत वाढवला. चौथ्या अंदाज १३० लाख टनांचा होता. म्हणजेच सरकारचा पहिला अंदाज यंदा दोन लाख टनांनी अधिक आहे. यात अंदाजात पुढील काळात वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र पिकाची स्थिती पाहून यंदा अंदाजात घट होण्याचीच शक्यता जास्त असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
मागील हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. त्यामुळं यंदा सोयाबीन लागवड वाढीचा अंदाज होता. मात्र पावसाचं प्रमाण कमी-जास्त राहीलं. तर अनेक भागांत उशीरा पेरणीयोग्य पाऊस झाला. तसचं पावसाचा खंड पडला. त्यामुळं पेरणीला उशीर झाला. लागवडीचा कालावधी कमी झाल्यानं सोयाबीन लागवडीचा वेगही मंदावला होता. परिणामी यंदा सोयाबीन लागवड ८ हजार रुपयांनी कमी झाली.
ऑगस्ट आणि जुलै महिन्यात बऱ्याच भागात सतत काही दिवसा पाऊस झाले. त्यामुळं पिकाला फटकाही बसलाय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पिकाचं नुकसान झाल्याचे अहवाल आहेत. त्यामुळं सरकारचा हा अंदाज नंतर कमी होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं. सध्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हंगामात शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
Share your comments