1. कृषीपीडिया

या पद्धतीने बियाण्यासाठी उन्हाळी सोयाबिन लागवड करा

कारण या वर्षी भारत भर सोया काढणीच्या काळात पाऊस झाला होता त्या मुळे बियाण्याचा किमती भरपूर राहण्याची शक्यता आहे. तसेच बियाणे भिजके आहे त्यामुळे उगवण कमी होण्याची शक्यता वाटत आहे..

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बियाण्यासाठी उन्हाळी सोयाबिन लागवड करा

बियाण्यासाठी उन्हाळी सोयाबिन लागवड करा

कारण या वर्षी भारत भर सोया काढणीच्या काळात पाऊस झाला होता त्या मुळे बियाण्याचा किमती भरपूर राहण्याची शक्यता आहे. तसेच बियाणे भिजके आहे त्यामुळे उगवण कमी होण्याची शक्यता वाटत आहे.. उन्हाळी सोयाबिनओलिताची सोय असलेल्या ठिकाणी या वर्षी विशेष बाब म्हणून उन्हाळी सोयाबीन पेरणी करावी काही . ज्या ठिकाणी सोयाबीन लागवड करावी.

पिकाचे योग्य व्यवस्थापन करावे

1) सोयाबीन हे सूर्यप्रकाश तसेच तापमानास संवेदनाशील असल्याने गैरहंगामात कायिक वाढीची अवस्था लांबत असल्यामुळे पक्वता कालावधीत खरिपाच्या तुलनेत 15 ते 20 दिवसांनी वाढ होऊ शकते.

2) सोयाबीनचे पीक 22 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते. परंतु, कमाल तापमानात 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूल गळणे, शेंगांची योग्य वाढ न होणे तसेच दाणे भरणे, दाण्याचा आकार कमी होतो.

3) उशिरा पेरणी केल्यास सोयाबीनचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत तीव्र तापमानात सापडू शकते. त्यामुळे दाण्याच्या आकारावर विपरीत परिणाम होतो. याशिवाय येणाऱ्या खरीप हंगामासाठी बियाणे प्रक्रियेला विलंब होऊन पुढील पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

4) पाणी देण्यासाठी शेताची समभागात विभागणी करावी. थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णतः उगवणीसाठी 12 ते 15 दिवस लागू शकतात. चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर 10 दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी दुसऱ्यांदा द्यावे. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या 12-15 दिवसांच्या अंतराने तसेच एप्रिल महिन्यात 8-10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.ज्या शेतात बीजोत्पादन घ्यावयाचे आहे, त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

झाडांची उंची, पानांचा आकार, झाडावरील लव, पान, खोड व फुलांचा रंग इ. लक्षणांनुसार भेसळ ओळखून नष्ट करावी.

 सोयाबीनमध्ये रोपावस्था, फुलोरा तथा शेंगांमध्ये दाणा भरण्याच्या अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील आहेत. या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.उन्हाळी सोयाबीनचे एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पन्न येते.

English Summary: Soybean plantation for seeds in summer season this method Published on: 21 January 2022, 09:22 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters