सोयाबीन वरिल तांबेरा रोगाचा प्रकोप होण्यासाठी पुढिल वातावरणातली परिस्थिती कारणीभूत असते१]लगातार पावसाळी वातावरण असल्याने किंवा_२]तापमान कमी झाल्यास (22 ते 27 डिग्री सेल्सियस) किंवा३]हवेतील अधिक बाष्प ( आर्द्रता 80-90%) इत्यादी४]त्याबरोबरच रात्री किंवा पहाटे पावसाळ्यातच धुके (धुवारी) सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास या रोगा ची तीव्रता अती जास्त असते. अशा सर्व कारणामुळे हा रोग पसरण्याची किंवा प्रादुर्भावाची सम्भावना जास्त असते. आणि अशी परिस्थिती सद्या बऱ्याच
भागात आहे करिता वेळीच उपाययोजना आवश्यक आहे करिता कृपया लेख वाचुन व समजून उपाययोजना करावी.तांबेरा रोगाची लक्षणेपानांवर सुरूवातीला फिक्कट लालसर व नंतर तेच गर्द लालसर रंगाचे पट्टे पडतात, अशा पट्टयांच्या पानांखालिल बाजुवर लालसर रंगाची पावडर जमा होते. भरपुर प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अशी पाने पांढ-या कागदावर झटकल्यास कागदावर लालसर, पांढरी पावडर जमा झालेली दिसुन येते.या रोगामुळे सोयाबीन पिकाचे ८० टक्यांपर्यंत नुकसान होणे शक्य आहे.
भरपुर प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अशी पाने पांढ-या कागदावर झटकल्यास कागदावर लालसर, पांढरी पावडर जमा झालेली दिसुन येते.या रोगामुळे सोयाबीन पिकाचे ८० टक्यांपर्यंत नुकसान होणे शक्य आहे.Up to 80 percent loss of soybean crop is possible due to this disease.रोग नियंत्रणाची उपाययोजना१] रोग प्रतिरोधक जातीची पेरणी करावी, उदा. इंदिरा सोया-9 किंवा फुले कल्याणी ई.२]रबी किंवा उन्हाळी सोयाबीनची लागवड टाळावी
३] सोयाबीन पिक मळणी नंतरच्या काळात इतर रबी पिक पेरणीच्या वेळेस उगवनार्या सोयाबीनची रोपे लवकर नष्ट करावी.४] रोगग्रसित रोपांना उपडुन पॉलीथिन मध्ये जमा करून शेता बाहेरील गड्यात गाडुन नष्ट करावे.५] हेक्साकोनाजोल किंवा प्रोपिकोनाजोल (टिल्ट) यापैकी कोणत्याही एका बुरशी नाशकाचा ७०० मीली प्रति हेक्टरी फवारणी करावी त्यानंतर प्रादूर्भाव क्षेत्रात पुन्हा १५ दिवसांनी यापैकीच एक बुरशीनाशकाची बदलुन फवारणी करावी.
संकलन : पंकज काळे ( M.Sc. Agri )
निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क क्र.- ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११
Share your comments