बुलडाणा जिल्हा सोयाबीन उतपन्नात आघाडीवर असुन याठिकाणी शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीपर्यंत तब्बल एकरी ३४ हजार रुपये खर्च होतो.भाव कमी असल्याने हा खर्च निघत तर नाहीच उलट शेतकरी तोट्यात रहातो जर सोयाबीनला भाव मिळाला तरच ही तुट भरून निघु शकते यावर्षी शेतक-यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला त्यामुळे पंचनाम्याचा फार्स न घालता नुकसान भरपाई मिळावी,विनाअट पिकविमा मंजुर करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी
व आपल्या हितासाठी शेतकऱ्यांनी पक्षीय राजकारण बाजुला ठेऊन एकत्रित येवून Farmers put aside party politics and come together for their own good दि.६ नोव्हेंबरला बुलडाणा येथे आयोजित
ट्रायकोडर्मा -एक नैसर्गिक रोगनाशक बुरशी
एल्गार मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चिखली येथे विश्राम ग्रुहावर झालेल्या बैठकीत केले.यावेळी अशोक पडघान, डॉ.मनोहर तुपकर,शंकरमहाराज येळगावकर भगवान मोरे, विनायक सरनाईक,नितीन राजपूत,संजय
खेडेकर,भारत वाघमारे,राम अंभोरे,विलास वसु,अजय जवंजाळ,अनिल चव्हाण,संतोष शेळके,अनिल वाकोडे,भारत खंडागळे,गजानन कुटे,विष्णु कुटे,विष्णु शेळके,भरत जोगदंडे,निरज गायकवाड,नितेश देवकर,प्रल्हाद म्हस्के,त्ता जेऊघाले,आमोल मोरे,गोपाल ढोरे,भागवत मस्के,सुधाकर तायडे,चेतन कणखर,रुषी वाघमारे,निलेश धोंडगे,सरदारसिंग इंगळे,रमेश
कुटे,राम कुटे,सतिष सुरडकर,आशु जामदार, रामेश्वर चिकणे,औचितराव वाघमारे,छोटु झगरे,अविनाश झगरे,जगाराव ठेंग, बालासाहेब ठेंग,शिवाजी देव्हडे,मधुकर ठेंग,रविभाऊ सपकाळ,राजेंद्र शेळके,पवन डुकरे,पांडुरंग शेळके, परमेश्वर शेळके,गणेश भगत,भारत गाढवे, यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी या बैठकीला उपस्थितीत होते.सोपा नावाची युनियन असुन ही ताकदवान युनियन असल्याने हे शासनावर दबाव आणून भाव
कमी करायला भाग पाडते.परंतु सतत असे भाव पडत रहाले आणि शेतकरी तोट्यात आले तर सोयाबीन पेरा कमी होईल आणि हे शासनाच्या गत वर्षी लक्षात आणुन दिले होते तेव्हा भाव वाढ मिळाली होती.जर सोयाबीन उत्पादक शेतकरी एकत्रितपणे लढले तरच भाव मिळणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनात उतरला तर त्यांच्या
मनासारखे भाव वाढ करण्यासाठी शासनावर दबाव आणतो त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तेथील लोकप्रतिनिधीं ना ते निवडणूकीत झटका देतात.तसाच दबाव गट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी निर्माण केल्यास सोयाबीनचे भाव पाडतांना राज्यकर्त्यांनी विचार करावा लागेल.त्यासाठी मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांना आंदोलनात सहभाग नोंदवीला पाहिजे आणि
शेतकऱ्यांची ताकद दाखवली तरच ह्या सर्व मागण्या शासन मंजूर करणार असल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितलं. आपल्या गरजा पुर्ण होऊन देखील आपल्याकडे २३ टक्के डिओसी शिल्लक रहाते हीच निर्यात करुन भाव वाढणार यात शंका नाही. मोठ्या उद्योजकांसाठी शासन निर्णय बदलल्या जातात. या मोर्चात पक्षाचे झेंडे बाजुला ठेवुन शेतकरी हितासाठी एकजुट होणे ही काळाची गरज असल्याचे
देखील त्यांनी यावेळी सांगुन मोर्चात महिला तसेच पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सर्कल नुसार गावागावात बैठका घेऊन शेतकऱ्यांना सोयाबीन भाव तसेच खर्च हे सुत्र समजावून सांगण्याचे देखील त्यांनी उपस्थितीतांना सांगितले.चिखली तालुका सोयाबीन-कापुस उत्पादकांच्या बैठकीला प्रचंड असा प्रतिसाद पहावयास मिळाला
Share your comments