शेतकरी खरीप व रब्बी हंगामात नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन मिळवत असतात. रब्बी हंगाम थोड्याच दिवसात सुरू होत आहे. या हंगामात रब्बी ज्वारीची शेती मोठ्या (Cultivation of Rabi Sorghum) प्रमाणात केली जाते. मात्र चांगल्या उत्पादनासाठी कोणत्या वाणाची लागवड करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतो. आज आपण चांगले उत्पादन देणाऱ्या वाणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
'मालदांडी-३५-१' ला पर्याय म्हणून पीकेव्ही क्रांती (एकेएसव्ही १३ आर) हा रब्बी हंगामात अधिक उत्पादन देणारा, सरळ व शुद्ध वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विकसित करण्यात आला आहे. या वाणाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे.
मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या या वाणाचे कणीस आकाराने मोठे, दाणे मोत्यासारखे चमकदार, ठोकळ आहेत. मध्यम ते भारी जमिनीकरिता उपयुक्त आहे. विशेष म्हणजे भाकरीची प्रत उत्तम आहे. यासह बाकी गुणामध्येही मालदांडी-३५-१ दर्जा आहे.
महत्वाची बातमी! तब्बल 19 खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी; खते खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
पीकेव्ही क्रांती या वानाचे वैशिष्ट्ये
1) रब्बी ज्वारीच्या अन्य सुधारित वाणांपेक्षा अधिक उत्पादनक्षम व आनुवंशिकदृष्ट्या वेगळा वाण. मध्यम ते भारी जमिनीसाठी कोरडवाहू आणि बागायती पेरणीसाठी उपयुक्त ठरत आहे. धान्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन २५-३० क्विंटल, कडब्याचे उत्पादन ७०-७५ क्विंटल.
2) मध्यम कालावधी. १२०-१२२ दिवसांत परिपक्व. दाणे ठोकळ व मोत्यासारखेच चमकदार. भाकरीची प्रत आणि चव उत्तम. खोडकिडा, खोडमाशी व कडा करपा यांना बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक बीजोत्पादनासाठी सोपे व दरवर्षी आपल्या शेतातील बियाणे वापरण्यास उपयुक्त आहे.
सोयाबीन दर अजूनही स्थिर; बाजारभाव वाढणार का? जाणून घ्या आजचे दर
3) विशेष म्हणजे हा वाण बागायती क्षेत्रासाठी प्रसारित केला आहे. भाकरीची प्रत उत्तम आहे. सरासरी धान्य उत्पादन ४० क्विंटल प्रति हेक्टर, तर कडबा उत्पादन ११५ क्विंटल प्रति हेक्टरी आहे. कोरडवाहूमध्ये मध्यम जमिनीत लागवडीस योग्य आहे.
4) वाण परिपक्व होण्याचा कालावधी ११२ ते ११८ दिवस आहे. धान्य उत्पादन २४ ते २५ क्विंटल प्रति हेक्टर, तर कडबा उत्पादन ६० ते ६५ क्विंटल प्रति हेक्टर आहे.
महत्वाच्या बातम्या
एलआयसीची नवीन पॉलिसी लाँच; 15 वर्षांनंतर तब्बल 22 लाखांचा लाइफ कव्हर मिळणार
शेतकऱ्यांनो जनावरांना योग्य आहार देऊन वाढवा रोगप्रतिकारक्षमता; होईल चांगला फायदा
शेतकऱ्याची कमाल! बिबीएफ तंत्राद्वारे घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न; जाणून घ्या पद्धती
Share your comments