1. कृषीपीडिया

ज्वारीला सापडले पर्यायी पीक, कमी कष्ट करून मिळणार मुबलक फायदा

सध्याच्या काळात शेतकरी वर्ग शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवत आहेत. शेतीबरोबरच जोडव्यवसाय करून शेतकरी आपल्या उत्पन्नाचा नवीन मार्ग तयार करत आहेत. सध्या च्या काळात शेतकरी फक्त अधिकचे उत्पन्न मिळावे एवढ्याच हेतूने शेती करत आहे. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करून शेतकरी शेतीमधील उत्पन्न वाढवत आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
rajma

rajma

सध्याच्या काळात शेतकरी वर्ग शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवत आहेत. शेतीबरोबरच जोडव्यवसाय करून शेतकरी आपल्या उत्पन्नाचा नवीन मार्ग तयार करत आहेत. सध्या च्या काळात शेतकरी फक्त अधिकचे उत्पन्न मिळावे एवढ्याच हेतूने शेती करत आहे. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करून शेतकरी शेतीमधील उत्पन्न वाढवत आहे.

यंदा चे वर्ष शेतकरी वर्गासाठी खूप हालाखीचे गेले आहे. खरीप हंगामापासून शेतकरी वर्गाच्या वाट्याला फक्त नुकसानच आले आहे. खरीप हंगामात नुकसान तसेच रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हवामानातील  आणि  वातावरणातील  होणार  बदल  आणि  पिकावर  पडणारी  रोगराई  यामुळे  शेतकरी  वर्ग संकटात  गेला होता.आपल्या राज्यात अजून बर्याच ठिकाणी पारंपरिक शेतीला  मोठ्या प्रमाणात महत्व दिले जाते  शिवाय पारंपरिक पिके घेतली जातात. त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू  मका  इत्यादी  पिकांचा समावेश आहे. सध्या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ज्वारी चे उत्पन्न घेतले जात असायचे परंतु मराठवाड्यातील लोकांना ज्वारी पिकाला एक पर्याय शोधून काढला आहे. मराठवाड्याबरोबरच 8 जिल्ह्यात ज्वारी पिकाला पर्याय शोधून काढला आहे. म्हणजे म्हणजे शेतकरी वर्गाला बक्कळ पैसा कमवून देणारा राजमा.

राजम्याला घेवडा असे सुद्धा म्हटले जाते. यंदाच्या वर्षी पासून अनेक शेतकऱ्यांनी राजम्याची लागवड केली आहे . पेरणी साठी एक एकर क्षेत्रात 25 किलो बियाणांची आवश्यकता असते. आणि एकर क्षेत्रामध्ये राजम्याचे 8 क्विंटल एवढे उत्पन्न मिळते आणि राजम्याला बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राजम्याला नगदी पीक म्हणून सुद्धा ओळखले जाते कारण कमी कष्टातून जास्त फायदा या पिकातून मिळतो.


पाणी नियोजन:-

प्रत्येक वर्षी रब्बी हंगामाच्या वेळी पाण्याची कमतरता असते. जास्त पाऊस झाला तरी त्याचा उपयोग रब्बी हंगामातील पिकांना अजिबात होत नाही त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी ठिबक सिंचन करून योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.

उत्पन्न:-

एकरी राजम्याचे उत्पन्न हे सरासरी 8 क्विंटल पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त मिळते. एक एकर राजमा पेरणीसाठी कमीत कमी 25 किलो बियाणे लागतात. तसेच बाजारात राजम्याला 9 हजार रुपये प्रति क्विंटल ते 8 हजार प्रति क्विंटल एवढा भाव मिळतो. म्हणजेच एक एकर क्षेत्रामधून 50 ते 55हजार रुपये आपण मिळवू शकतो.

English Summary: Sorghum has found an alternative crop, with less effort to reap the benefits Published on: 11 February 2022, 07:01 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters