सध्या अख्खा महाराष्ट्र थंडीने गारठतआहे. तसेच वातावरणात दाट धुके देखील पसरत आहे वातावरणामध्ये धुक्याचे प्रमाण वाढले तर पिकाचे नुकसान होते.
कांदा पिकाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यामुळे कांदा पिकाची शेंडे पिवळी पडण्यास सुरुवात होते. धुक्यामुळे कांदा पिकावर मावा, करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता असते.धुक्यापासून कांदा पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना करावी याबाबतची माहिती या लेखात घेऊ.
अशा पद्धतीने धुक्यात कांदा पिकाची काळजी घ्यावी…..
- हिवाळ्याच्या दिवसात कांद्याच्या पातीवर जे मोठ्या प्रमाणात दव साठलेले असते, ते काढणे गरजेचे असते. यासाठी प्रेशर पंपाच्या सहाय्याने पाण्याची फवारणी करू शकतात. त्यामुळे पातीवरील धुके नाहीसे होऊन जाईल.
- धुकेज्या वेळी पडत असेल त्याच वेळी पिकावर फवारणी घेणे गरजेचे असते. दुपारी फवारणी घेऊ नये तसेच पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करू शकतात.
- तसेच सिलिकॉन बेस स्टीकर ची पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात.
- ज्या शेतकऱ्यांचा कांदा स्प्रिंकलर किंवा रेन पाईप वर आहे त्यांनी सकाळच्या धुक्याच्या वेळात पाच ते दहा मिनिटांसाठी स्प्रिंकलर सुरू करावी.
- धुक्यावर पूर्वीपासून चालत आलेला एक उपाय म्हणजे पूर्वीच्या काळी शेतकरी लिंबाच्या पानांचा सहायाने कांद्याच्या पातीवरील धुके झटकायची. हा देखील उपाय उत्तम आहे.
- तसे पाहिल्यास कांदा पिकाला रोजच्या रोज फवारणीची आवश्यकता नसते. परंतु रोजच जर धुके पडत असेल तर तीन दिवसांतून एकदा बुरशीनाशकाची फवारणी करावी. शक्यतो द्रव्य स्वरुपातील बुरशीनाशकाचा वापर करावा.
Share your comments