1. कृषीपीडिया

हळद पिकासंदर्भात लागवड पश्चात सद्यस्थितीत अंगीकार करावयाच्या काही महत्त्वाच्या बाबी.

हळद पिकासंदर्भात लागवड पश्चात सद्यस्थितीत कोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हळद पिकासंदर्भात लागवड पश्चात सद्यस्थितीत अंगीकार करावयाच्या काही महत्त्वाच्या बाबी.

हळद पिकासंदर्भात लागवड पश्चात सद्यस्थितीत अंगीकार करावयाच्या काही महत्त्वाच्या बाबी.

हळद पिकासंदर्भात लागवड पश्चात सद्यस्थितीत कोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार त्याचा अंगीकार केला जाऊ शकतो ते जाणून घेऊ.(१) हळदीच्या कंदाच्या सुप्त अवस्थेनुसार साधारणपणे 20 दिवसापासून 40 दिवसापर्यंत हळदीची चांगल्याप्रकारे उगवण होते. हळदी मध्ये सुरुवातीचा दीड महिना हा पहिली उगवनिची अवस्था म्हणून ओळखल्या जातो. या दीड महिन्यापर्यंत म्हणजे हळदीची चांगली उगवण होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा जमिनीतून वापर हळद पिकाला करू नये.(२) हळद पिकामध्ये तणनाशकाचा वापर टाळावा. व इतर पर्यावरण निष्ठ एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचे घटक वापरून आवश्यकतेनुसार तनाचे व्यवस्थापन करावे.

(३) हळद पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमी असल्यास आवश्यकतेनुसार ह्युमिक ऍसिडचा वापर करू शकता त्याकरता 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे ह्युमिक ऍसिड एकरी एक लिटर याप्रमाणे ठिबक सिंचनातून आळवणी करून म्हणजेच ड्रेंचिंग करून आवश्यकतेनुसार जमिनीतून सोडून देता येते. या ह्युमिक ऍसिड च्या वापरामुळे हळदीच्या रोपास पांढरी मुळी उत्तम सुटून वाढ चांगली होण्यास मदत होते.The use of humic acid helps the turmeric plant to develop white roots better and grow better.(४) ज्या हळदीच्या पिकामध्ये पहिली वाढीची अवस्था पूर्ण झाली आहे म्हणजेच हळदीची पूर्ण उगवण झाली आहे म्हणजेच हळद लागवडीनंतर साधारणता 45 दिवसांनी ( लागवडीनंतर सात आठवड्यांनी) नत्रयुक्त खताचा पहिला डोस एकरी 75 ते 80 किलो युरिया किंवा एकरी 194 किलो अमोनियम सल्फेट यापैकी कोणत्याही एका खताच्या रूपात द्यावा.

(५) सर्वसाधारणपणे माती परीक्षणाच्या अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन गरजेनुसार एकरी चार ते पाच किलो फेरस सल्फेट व एकरी चार ते पाच किलो झिंक सल्फेट पुरेशा शेणखतात मिश्रण करून लागवडीनंतर साधारण 45 दिवसानंतर माती परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावर गरजेनुसार जमिनीतून वापर करावा.(६) विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे हळद पिकाला करावयाचा झाल्यास हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज सांगली यांचे शिफारशीत विद्राव्य खताच्या शिफारशीत वेळापत्रकाप्रमाणे करावा. (७) हळदीची पूर्ण उगवण झाल्यानंतर कंद कुज च्या प्रतिबंधासाठी आवश्यकतेनुसार प्रति एकर तीन ते चार लिटर द्रवरूप ट्रायकोडर्मा या जैविक

बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनाद्वारे आळवणी म्हणजे ड्रेंचिंग करावे.(८) सद्य परिस्थितीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार हळदी मध्ये साधारणता पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. बाष्पीभवन गुनाकानुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार जमीन कायम वाफसा परिस्थितीमध्ये राहील अशा दृष्टीने ठिबक सिंचनाचा संच सुरू ठेवावा. हळद पिकाला पाणी देताना अतिरिक्त पाणी दिले जाणार नाही तसेच पाण्याचा ताण सुद्धा पडणार नाही याची काळजी घ्यावी.टीप : हळद पिका संदर्भात सर्व साधारण कल्पना यावी या दृष्टिकोनातून काही बाबी वर दिल्या असल्या तरी आवश्यकतेनुसार संबंधित विषयाच्या तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार प्रत्यक्ष संबंधित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानुसार तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. 

 

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Some important points to be adopted in post-planting situation regarding turmeric crop. Published on: 23 July 2022, 07:32 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters