1. कृषीपीडिया

मातीची परीक्षा नाही परीक्षण करा

नमस्कार मंडळी आजचा लेख माझ्या केव्हीके घातखेड ला समर्पित आहे व आपण हा वाचाल! मला खात्री आहे मित्रांनो आपली माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय पदार्थ,हवा, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्मजीवांचे मिश्रण म्हणजे आपली माय माती होय. जी वनस्पती तसेच जीवनसृष्टी साठी महत्त्वाचा दुवा ठरते. आज आपण जाणून घेऊयात माती विषयी खास माहिती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the soil

the soil

नमस्कार मंडळी आजचा लेख माझ्या केव्हीके घातखेड ला समर्पित आहे व आपण हा वाचाल! मला खात्री आहे मित्रांनो आपली माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय पदार्थ,हवा, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्मजीवांचे मिश्रण म्हणजे आपली माय माती होय. जी वनस्पती तसेच जीवनसृष्टी साठी महत्त्वाचा दुवा ठरते. आज आपण जाणून घेऊयात माती विषयी खास माहिती.

 मातीची महत्त्वाची कार्य काय आहेत?                   

मातीची व्याख्या म्हणजे वनस्पती उगवण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. मातीही खताला कंपोस्ट करणारी यंत्रणा होय. माती वातावरणात बदल घडवून आणते व सूक्ष्मजीवांचे वस्तीस्थान आहे.ती आपली जमीन मानवी आरोग्याची काळजी घेताना विविध बाबींचा ज्या गतीने विचार होतो,तेवढ्याच गतीने जी जमीन आपल्याला उत्पादन देते त्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विचार करायला हवा. नवनवीन उत्पादन घेताना होणाऱ्या खताचा वापर व जमिनीच्या पोताकडे होत चाललेले दुर्लक्ष यातून जमिनीची उपजत क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

 मित्रांनो,आपण आपल्या जमिनीतील सूक्ष्म जीवांचे प्रमाण तपासले पाहिजेत व त्यानुसार कोणत्या पिकाला खताची किती मात्र द्यावी याचे ज्ञान आपण मातीपरीक्षण या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केला गेले पाहिजे. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा पोत भिन्नभिन्न असल्यामुळे प्रत्येकाच्या खताची मात्रा ही वेगळी असणार ही बाब शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी शेतीशाळा आपणच हाती घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक शेत शिवारातील मातीचा पोत भिन्न असतो कारण प्रत्येक शेतशिवारातील मातीचा पोत भिन्न असतो. एखाद्या शेतकऱ्याकडे 10 ते 15 एकर जमीन असली तरी प्रत्येक पट्टीतील मातीचा पोत भिन्न असतो. एकदा माती परीक्षण करून भागत नाही. किमान दर दोन वर्षांनी मातीत होणारे बदल लक्षात घेऊन त्यानुसार खताचा वापर केला गेला पाहिजे.

हेही तेवढेच महत्त्वाचे आहे..सर्व शेतकरी,शेतकरी बचत गट शेतकऱ्यांनी गावागावात सभा घेऊन शेतकऱ्यांना माती परिक्षणाची महत्त्व सांगून माती परीक्षण करिता प्रोत्साहित करावे व कृषी विज्ञान केंद्राशीसंपर्क साधला पाहिजे. कारण सुरुवात स्वतःपासून करणं हे लक्षात घ्यावे. आपल्या शेतातल्या मातीचा सुपीक थर म्हणजे काय आणि तो कसा तयार झालेला आहे हे त्याला माहीत असेल  तरचत्याला त्या थराची किंमत कळेल आणि त्याचा लहानसा ही थर वाहून जाता कामा नये याची खबरदारी घेईल. सेंद्रिय पदार्थ मातीत पोषक आणि पाण्याचा साठा म्हणून काम करते, कंपॅक्शन आणि पृष्ठभागावरील कवच कमी करण्यास मदत करते आणि माती मध्ये पाण्याची घुसखोरी वाढवते. तरीही बऱ्याचदा  दुर्लक्ष केले जाते. मातीमधील सेंद्रिय पदार्थांच्या योगदानाची तपासणी करू आणि तो कसा टिकवायचा किंवा कसा वाढवायचा हे समजून घेणे आवश्यक आहे.

 मित्रांनो माझ्या अनुभवावरून मातीचा शेवटचा आणि महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तापमान. मातीचे तापमान खूप कमी असेल अशावेळी बियाण्याची उगवण उशिरा होते  आणि तापमान जास्त असेल तर काही वेळा बियाण्याची उगवण सुद्धा होत नाही. बियाण्याच्या उगवणी पासून पीक काढणीपर्यंत जमिनीचे तापमान योग्य असणे गरजेचे आहे. कारण वनस्पतींच्या वेगवेगळ्या जैविक क्रियांचा वेग हा या तापमानावर अवलंबून असतो.

मातीचे तापमान योग्य असेल तर जमिनीमध्ये असलेल्या उपलब्ध अन्नघटकांचे वहन पिकाच्या मुळांपर्यंत तसेच वनस्पतीच्या प्रत्येक भागात चांगल्या प्रकारे होऊन पीक उत्पादन चांगले होते. अनेक सुपीक जमिनी आवश्यक असून लोकांच्या आरोग्याचा पाया आहे यात काही शंका नाही.मानवी विकास आणि प्रगतीची गुरुकिल्ली जमिनीचे आरोग्य आहे. माझे थोडक्यात सांगायचे झाले तर कृषी संबंधित विविध तंत्रांचा वापर करून शेतीशी निगडित संसाधन अधिक कार्यक्षमतेने उपयोग करता येऊ शकतो.ज्यामध्ये शेती उत्पन्न वाढवणे, खते तसेच शेतीला लागणारे कीटकनाशक यावर खर्च कमी करणे, जमिनीचा कस वाढवणे इत्यादी कामे शक्य होईल. या तंत्राचा अधिक वापर होऊ लागेल. शेतकऱ्यांमध्ये चांगले वातावरण तयार होऊन शेतकऱ्यांसाठी अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध होऊ लागतील.

 लेखक-

 मिलिंद जि.गोदे

 युवा शेतकरी मित्र

English Summary: soil testing is so important for more crop production and get benifit to farmer Published on: 20 January 2022, 09:35 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters