ह्युमस म्हणजे जमिनितील अन्नद्रव्याचे भांडार आहे जमीन हि अन्नपूर्णा पण हा ह्युमस वाढतो फक्त आणी फक्त आच्छादणाचे प्रकार मुळे आज सगळ्या बागायती जमीनीचे ह्युमस सेंद्रिय कर्ब संपत चाललाय
1) ह्युमस जमिनीला सुपिकता प्रदान करते. जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक बनते. जीवन द्रव्याची निर्मिती काष्ठ पदार्थाच्या विघटनातून (कुजण्यातून) होते.
काष्ठ पदार्थ केवळ पिकांचे अवशेष नसून प्रत्येक सजीवांचे शरीर होय. काष्ठ पदार्थाचे विघटन करणारे अनंतकोटी सूक्ष्मजीवाणु असतात.
त्यामध्ये जंतू व बुरशींचा समावेश असतो (बॅक्टेरिया व फंगस). म्हणजेच जीवन द्रव्याची निर्मीती, पिकांचे अवशेष सुक्ष्म जीवाणूंच्या कुजण्याततून होते. म्हणजेच ह्युमस च्या निर्मीतीसाठी काष्ठ पदार्थांचा आच्छादन व सुक्ष्म जीवाणूंचे विरजन ह्या दोन गोष्टीची आवश्यकता असते. जगामध्ये जेवढे काही सुक्ष्मजीवानूंचे विरजण (कल्चर) आहेत त्यामध्ये सर्वोत्तम विरजण भारतीय देशी गायिचे शेण आहे.
2) जमीन अन्नपुर्णा
जमिनीला वरून अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागतो हा कृषी विज्ञानाचा सिद्धांत खोटा आहे.
निसर्गामध्ये जंगलातल्या कोणत्याही झाडाच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत नाही. अर्थात ही सगळे अन्नद्रव्य झाडांनी जमिनीतूनच घेतली असल्यामूळे जमिनीत काही नाही हे म्हणणे खोटे आहे. ह्याचा अर्थ जमीन सगळयाच अन्नद्रव्यांनी संपृक्त आहे. म्हणून जमीन ही अन्नपूर्णा आहे.
जमिनीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे खोल जातो तसतशी अन्नद्रव्यांची मात्रा वाढत जाते. ह्याचा अर्थ खोलवरची जमीन अन्नपूर्णा आहे. जंगलामध्ये सुद्धा हीच रचना असते.
ज्या झाडांच्या पानांमध्ये कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत नाही त्यात ही सगळी अन्नद्रव्य जमिनीच्या खोलवरील भागांतून आपोआप मुळी पर्यंत पोहोंचतात पण आपोआप काहीही घडत नाही ह्याचा अर्थ ही सगळी खोलवरची अन्नद्रव्य खोल जमिनीमधून मुळापर्यंत पोहोचवणारी कोणती तरी निसर्गाची यंत्रणा असली पाहिजे? त्याशिवाय झाडाला अन्नद्रव्य पोहचू शकत नाहीत .
Share your comments