मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते. त्याचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.
उपाययोजना
जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या अपधाव पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी.
पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावीत.
पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावीत.
शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे
Share your comments