अगदी ढोबळमानाने विचार केल्यास मातीमध्ये २५% हवा , २५ % पाणी , ४५ % खनिजे आणि ५% सेद्रिय कर्ब असल्यास अशी माती शेतीसाठी सर्वात चांगली मानता येईल. साधारणता सध्याच्या घडीला माती परीक्षांणानुसार १ % सेद्रिय कर्ब असल्यास अत्यंत जास्त असा शेरा मिळतो. म्हणजेच ५ % सेद्रिय कर्ब ही सध्या जवळपास कोणत्याच शेतकऱ्यांच्या आवाक्यातली गोष्टं दिसत नाही. कसा कुस्ती लढणार सेद्रिय शेतीचा पहेलवान ?सेद्रिय कर्बचे कार्य – एक महत्वाची बाब म्हणचे , पिके (झाडे) सेद्रिय कर्बचा उपयोग अनद्राव्य म्हणून करतच नाहीत. तर सेद्रिय कर्ब हे मुख्यत्वे मातीतील जिवाणूंचे खाद्य आहे. म्हणजेच जीवाणू सेद्रिय कर्ब खाऊन , मातीतील अनद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात. उदारणार्थ शेण खतातील नत्र अमोनिया (NH3) ह्या स्वरुपात असून Nitrobactor कुळातील बाक्टेरिया त्याचे रुपांतर Nitrate किवा Nitrite (NO३ / NO२) मध्ये करून पिकांना पचनीय स्वरुपात आणून देतात.
इतर सर्व अन्नद्रव्यच्या उपलब्धते साठी झाडे जमिनीतील सुक्ष्म-जीवनवरच अवलंबून असतात. सेंद्रिय कर्ब मातीचे भौतिक गुणधर्म जसे कि मातीची पाणी धारण क्षमता, भुसभुशीतपणा इ. सेंद्रिय कर्ब च्या उपलब्धते प्रमाणे बदलते. साधारणता असे मानले जाते कि २ ते ५ % पर्यंत सेंद्रिय कर्ब असणाऱ्या (जंगलातील चहाच्या पुडी सारखी माती ) १ चमचाभर मातीमध्ये पृथ्वीवरील लोकसंख्ये पेक्षा जास्त जीवाणू असू शकतात.सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे – सध्या आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी (०.१ ते १ %) असण्याचे मुख्य करण – व्यावहारिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर , जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण , पिक पलटणी न करणे , मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे ही दिसतात. नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते. पण व्यवहारिक दृष्टिकोनातून बघताना जमिनीची मशागत न करणे हा पर्याय तरी आता शक्य दिसत नाही.
जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवून सेंद्रिय किंवा शाश्वत शेती कशी करता येईल – जमिनीमध्ये एखादी गोष्ट कुजण्यासाठी ज्या मुख्य गोष्टींची गरज असते त्यामध्ये जमिनीतील ओलावा (पाण्याचे योग्य प्रमाण) आणि नत्राचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीला नत्राचे प्रमाण हे मुख्यता काडी-कचरा (Soil Organic Matter) प्रकार , हवामान इ. वर अवलंबून असते. जसे कि झाडांच्या पानां पेक्षा प्राण्यांपासून तयार झालेला कचऱ्यात ( शेण,गोमुत्र , मासळी खत इ.) जास्त नत्र असते. म्हणूनच उसाच्या पाचटापेक्षा , शेण किवा कोंबड खताला जास्त जोर असतो.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीतील ओलाव्या नुसार बदलणार असेल तर ह्याचा अर्थ असा की एखाद्या परिसरातील हवामानानुसार मातीमध्ये काडी-कचरा कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये होण्यासाठी कमी-जास्त वेळ लागू शकतो. सोबतच्या चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे , काडी-कचरा कुजून उपयुक्त सेंद्रिय कर्ब बनण्यासाठी १-५ वर्ष लागू शकतात आणि हा सेद्रिय कर्ब स्थिरावून जमीन पूर्णपणे कसदार होण्यासाठी २० वर्षापर्यंत वेळ लागेल.
हि वेळ कामी करण्यासाठी काही उपाय आहेतजसे कि काडी-कचरा जमिनीत कुजण्यास १ महिना लागत असला तरी गाईच्या पोटात तो एका दिवसात कुजतो आणि शेण मिळते. हे शेण biogas मध्ये वापरल्यास मिळणारी slurry जास्त उपयुक्त होते , ह्या slurry चे गांडूळ खत केल्यास सेंद्रिय कर्ब लवकरात लवकर मिळवता येईल. पण एक दिवसात कोणत्याही तयारी शिवाय सेद्रिय शेती कडे वळणे म्हणजे नुकसान अटळ !कोकणात जिथे पावसाचे आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे तेथे एखादी गोष्ट कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये लवकर होईल ह्याविरुद्ध विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये मातीतील ओलावा कमी असल्यामुळे एखादी गोष्ट कुजण्यासाठी जास्त वेळ लागेल. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी हवामानानुसार काही गोष्टींचा अभ्यास करून शेतीतील आंतरमशागती किंवा शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा कराव्या लागतील.
Share your comments