आपण पिकांना भरघोस आणि निरोगी वाढीसाठी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करतो. रासायनिक खते देताना आपण ती पिका जवळ टाकून देतो किंवा सरीमध्ये बहुतांशी मक्या सारख्या पिकाला टाकले जाते. बहुतांशी दाणेदार श्रेणीतील जी काही खते आहेत, ती अशापद्धतीने दिली जातात. परंतु विद्राव्य खते देण्यासाठी बऱ्याच अंशी शेतकरी ड्रीपचा वापर करतात.
कारण विद्राव्य खतांमध्ये विद्राव्य क्षमता उत्तम असल्यास कमी पाण्यात जास्त खते परिणामकारकरित्या देणे देखील शक्य होते.
पीक उत्पादनामध्ये अभ्यासपूर्वक खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. परंतु फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्याने देखील खूप मोठा फायदा होतो. या लेखात आपण फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर व त्याचे फायदे याबद्दल माहिती घेऊ.
फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा वापर एक प्रभावी पद्धत
1- आपण पिकांना जमिनीच्या माध्यमातून जो काही पोषक द्रव्यांचा पुरवठा करतो त्यासोबतच पिकांच्या पर्णरंध्रे यांच्या माध्यमातून पिकांचे पोषण ही एक प्रभावी पद्धत आहे.
2- कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते त्यामुळे पिकांना अन्नद्रव्य देणे मर्यादित असते किंवा शक्य होत नाही. अशावेळी फवारणीच्या माध्यमातून पिकांना फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्य पुरवणे खूप फायद्याचे ठरते.
3- सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तापमानातील उतार-चढाव त्यालाच आपण तापमानाचा तनाव असे देखील म्हणू शकतो, मातीमध्ये असलेला खूप कमी किंवा जास्त ओलावा, पिकांच्या मुळांद्वारे पसरणारे बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि मातीमध्ये असलेल्या
पोषक द्रव्यांचे असंतुलन अशा गोष्टी जाणवतात तेव्हा पिकांना जमिनीतून लागणारी तेवढे अन्नद्रव्य घेता येणे शक्य होत नाही.अशा परिस्थितीत पानांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांचा पुरवठा खूप महत्त्वाचा ठरतो व तात्काळ पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करता येते.
फवारणीद्वारे विद्राव्य खते देण्याचे फायदे
1- जमिनीतून खते देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत जर आपण फवारणीद्वारे अन्नपुरवठा करण्याच्या पद्धतीचा विचार केला तर फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता जवळजवळ दहा पटीने जास्त वाढते.
2- जेव्हा आपल्याला पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता दिसू लागते तेव्हा ती कमतरता पटकन भरून काढण्यासाठी पानांद्वारे पोषण देणे खूप महत्त्वाचे असते.
3-जेव्हा पिकांच्या वाढीच्या अवस्था असते तेव्हा अवस्थेनुसार पिकांना वेगवेगळ्या प्रमाणात पोषक द्रव्यांची गरज असते. अशा परिस्थितीत पोषण संतुलित ठेवणे खूप गरजेचे असते. अशावेळी जर फवारणीद्वारे पिकांना अन्नद्रव्य दिली तर पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
Share your comments