नागपुर जिल्ह्यामध्ये, भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ ते ०६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ राहण्याची आणि हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमाल व किमान तापमान ३१.१ ते ३१.६ आणि १०.७ ते ११.२ अंश सेल्सिअस तसेच सरासरी वाऱ्याचा वेग ५.० ते ७.० किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कृषी सल्ला
रब्बी हंगामातील पिके, फळबागा व भाजीपाल पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे, कीड व रोग व्यवस्थापनासाठी लेबल क्लेम आधारित शिफारशीत असलेले कृषी रसायनांची फवारणी ची कामे तसेच उभ्या पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी खते देण्याची कामे तसेच जमिनीतील उपलब्ध ओलावा व पिकाची गरज लक्षात घेता ओलीत करण्याची कामे सुरु ठेवावीत.
पिकास ओलीत करताना संध्याकाळच्या वेळी प्राधान्य द्यावे तसेच उपलब्धतेनुसार तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. टरबूज व खरबूज पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी भुईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुंद वाफा व सरी पद्धतीने करावी.
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ ते ०६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान आकाश निरभ्र ते आंशिक ढगाळ राहण्याची आणि हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमाल व किमान तापमान ३१.१ ते ३१.६ आणि १०.७ ते ११.२ अंश सेल्सिअस तसेच सरासरी वाऱ्याचा वेग ५.० ते ७.० किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Share your comments