1. कृषीपीडिया

करा शतावरीची लागवड मिळवा लाखात उत्पन्न

shatavari cultivation

shatavari cultivation

 आजकाल शेतकरी परंपरागत असलेली शेतीची पद्धत सोडून आधुनिक शेतीकडे वळत आहे. पूर्वीचे पारंपरिक पिके घेतली जात होती त्याला फाटा देत शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या व्यापारी दृष्टिकोनातून किती घेत आहे. अलीकडेच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या बाराच्या भागात  जिरेनियम लागवड, ड्रॅगन फ्रुटइतकेचनाहीतरमहाराष्ट्रातील शेतकरी आता सफरचंद सारख्या दुर्मिळ फळपिकांकडे देखील वळले आहेत. त्यातच औषधी वनस्पती हा पर्यायदेखील शेतकरी अवलंबताना दिसत आहेत. या लेखात आपण अशाच एका औषधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे शतावरी.

शतावरी साठी आवश्यक जमीन आणि हवामान

 या पिकाच्या लागवडीसाठी सर्व प्रकारची माती चालते. पण वाळूमिश्रित पोयट्याची, लाल किंवा काळी जमीन अधिक चांगले असते. मातीत पाण्याचा निचरा होत असेल तर फारच उत्तम असते तसेच जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले असावे व जमीन  20 ते 30 सेंटिमीटर पर्यंत भुसभुशीत असावी. जर या पिकासाठी लागणारे हवामानाचा विचार केला तर यासाठी उष्ण किंवा समशीतोष्ण वातावरण चांगले मानवते. तसेच एक दुष्काळी भागात त्याचबरोबर थंड वातावरणात देखील येऊ शकते.

 करावी लागणारी पूर्वमशागत

 या पिकासाठी लागवडीचे क्षेत्र ची निवड करताना जमीन व्यवस्थित भुसभुशीत करावी. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून त्यामध्ये  20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे तसेच रोटाव्हेटरच्या साह्याने शेतात असलेले ढेकूळ फोडून  घ्यावीत. पाऊस पडल्यानंतर कुळवणी करून साठ  सेंटीमीटर अंतराच्या सऱ्या पाडून घ्याव्यात.

 शतावरीची लागवड

 तयार केलेल्या सरी-वरंबा पद्धतीचा लागवडीसाठी वापर करावा. शतावरीची वंशवृद्धी साठी एक किलो बियाणे प्रति हेक्‍टर, गड्यांच्या फुटव्यापासून किंवा ओल्या मुळा पासून पण रोपेतयार केले जातात.सऱ्या पाडतांना दोन सऱ्यामधील अंतर हे 60 सेंटिमीटर ठेवावे. त्याचबरोबर सरीवर आंब्याची उंची जास्त चढवून  घ्यावी.कारण शतावरीच्या  मुळ्या एक ते दीड फुटापर्यंत खोल जातात. त्याप्रमाणे 60 सेंटिमीटर पर्यंत वरंब्याची उंची करून घ्यावी कारण काढणीला त्रास होत नाही तसेच दोन रोपांमधील अंतर हे60 ते 75 सेंटिमीटर ठेवावे.

 शतावरीचीकाढणी

 • लागवडीनंतर 18 ते 20 महिन्यांनीकाढणीकरतायेते.
 • शतावरीच्या झुबक्यांनी वाढलेल्या मुळे खणून काढाव्यात व वेलीची खोडी तशीच ठेवावीत.
 • काढलेली मुळे स्वच्छ करून लगेच मुळांवरील बारीक साल काढून 10 ते 15 सेंटिमीटर लांबीचे तुकडे करावेत. मुलांमधील शिर ओढून काढावी म्हणजे वाळण्याची प्रक्रिया लवकर होते.

शतावरी उत्पादन

 • पांढरी शतावरी च्या 10 ते 12 टन प्रति हेक्‍टर मुळ्या मिळतात.
 • पिवळी शतावरी पासून चार ते 60 टन प्रति हेक्‍टर मुळ्या मिळतात.

 शतावरी चे औषधी महत्त्व

 • शतावरीचवीस कडू व पचनास हलकी असते.
 • शतावरी वात व पित्तनाशक असून सर्व शरीर धातूंना बळ देणारी, बुद्धीचा तल्लख पणा वाढवणारी व डोळ्यांना हितकारक आहे.
 • पित्तप्रकोप, अपचन आणि जुलाब यासाठी मधातून शतावरी दिली जाते.

 

 • शक्ती वाढविण्यासाठी शतावरी चूर्ण दुधात खडीसाखर मिसळून द्यावे.
 • मुतखड्यासाठी शतावरीचा रस सात दिवस सकाळच्या वेळी घ्यावा.
 • आंबट कडू डेकर, बेंबी भोवती पोट दुखणे या व्याधींवर गुणकारी आहे.
 • शरीरात वाढलेल्या पित्तामुळे छातीत दुखणे, घशाला जळजळ, तोंडास कोरड पडणे डोके दुखनेयावर उपयुक्त

टीप-( शतावरी चे औषधी उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters