1. कृषीपीडिया

काही नवे! शेतीत हटके प्रयोग करणाऱ्या शेतकरी बंधूंसाठी ठरेल शतावरी लागवड फायद्याची

सध्या पारंपारिक शेती पद्धत आणि पिकेजवळजवळ हद्दपार होत आलेले आहेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची किनार लाभत असून त्यासाठी वेगवेगळी पिके शेतकरी शेतात घेऊ लागले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cultivation process of shatawari crop

cultivation process of shatawari crop

सध्या पारंपारिक शेती पद्धत आणि पिकेजवळजवळ हद्दपार होत आलेले आहेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची किनार लाभत असून त्यासाठी वेगवेगळी पिके शेतकरी शेतात घेऊ लागले आहेत.

अगोदर काही वर्षांपूर्वी आपण पाहिलेतर प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, कडधान्य वर्गीय पिके व काही प्रमाणात तेलबिया पिकेप्रामुख्याने घेत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल या एकाच उद्देशाने प्रामुख्याने शेती केली जात होती. परंतु हळूहळू  यात बदल होत गेले. नवनवे तंत्रज्ञान शेतीत येऊ घातले. कृषी क्षेत्रात हरितक्रांतीने प्रवेश केल्यानंतर शेतीचे रूपच पालटले. आता तर शेतकरी विविध प्रकारची पिकेये घेऊ लागली आहेत.अगदी विदेशी भाजीपाला, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुटएवढेच नाही तरमहाराष्ट्रात काही ठिकाणीप्रायोगिक तत्त्वावर सफरचंदाची लागवड देखील यशस्वीकेली आहे.बरेच शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करीत असतातव त्यांना काहीतरी वेगळेकरण्याची इच्छा असते. कायम शेतीत नवनवीन पिकांचे प्रयोग बरेच शेतकरी राबवितात. अशा शेतकऱ्यांसाठी औषधी वनस्पतींची लागवडीचा प्रयोग महत्त्वाचा ठरू शकतो. या लेखात आपण शतावरी या औषधी वनस्पतीच्या लागवडी विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:सुक्ष्मजीव आणि फॉस्फरस यांचे घनिष्ठ नाते जाणून घ्या

 शतावरी लागवड

 आपल्याला माहित आहेच की शतावरी एक औषधी वनस्पती आहे. आरोग्याच्या दृष्टीने  एक महत्त्वाची वनस्पती आहे. शतावरी चे दोन प्रकार येतात एक पांढरी शतावरी आणि एक पिवळी शतावरी हे होय.

जर शतावरीची लागवड करायची असेल तर ती  नोव्हेंबरते डिसेंबर या महिन्यांमध्ये करणे महत्त्वाचे असते.लागवड करताना शतावरीच्या बिया टोकून देखील लागवड केली जाते किंवा गड्ड्याच्या फुटव्यापासूनत्याची लागवड केली जाते.आता लागवडीत अंतराचा विचार केला तर शतावरीच्या प्रकाराप्रमाणे पिवळी शतावरी लागवड करायची असेल तर तीन बाय तीन किंवा तीन बाय दोन फूट अंतरावर करावी आणि पांढरी शतावरी लागवड करायची असेल तर चार बाय तीन फूट हे अंतर योग्य ठरते. आता जमिनीचे निवड करायचे असेल तर त्यासाठी मध्यम, रेताळ, हलकी ते पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य ठरते  आणि हवामान उष्ण आणि समशीतोष्ण राहिले तर शतावरी ची वाढ चांगली होते.

 लागवडीआधी पूर्वमशागत महत्त्वाची

 सगळे पिकांप्रमाणेच शतावरी साठी जमीन तयार करताना अगोदर ती नांगरून घ्यावी.त्यानंतर कुळवाच्या पाळ्या द्याव्यात व जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर पुरेशा प्रमाणात शेणखत व्यवस्थित मिसळून घ्यावे. हे झाल्यानंतर पाच फूट अंतरावर एक फूट खोल आणि एक फूट रुंद असे चर खोदावेत व चरातील माती काढून अर्ध्या माती मध्ये शेणखत मिसळावे व ते चर निम्म्याने भरावेव जी निम्मी माती उरलेली असते ती रोपे जेव्हा लावाल  तेव्हा भरतांना वापरावी.

 शतावरी लागवड करीत असताना महत्वाचे टिप्स

1- ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी लागवडीसाठी फायदेशीर ठरतो. वरती आपण पाहिलेच की लागवड ही बिया टोकून किंवा गड्डयाच्या फुटव्यापासून किंवा कठीण खोडाच्या कलमापासून रोपे तयार केली जातात व ती रोपे लावली जातात.

2- लागवड करताना दहा ते पंधरा सेंटिमीटर उंच फुटवे आलेली रोपे लावावीत.

3- लागवड केल्यानंतर पहिले तीन ते चार दिवस हलके हलके पाणी द्यावे. त्यानंतर मात्र एक दिवसात दोन वेळेस पाणी द्यावे. नंतर पिकाच्या गरजेप्रमाणे पाणी द्यावे. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी झाडाच्या बुंध्याभोवती चर किंवा खड्यावर पालापाचोळा किंवा गवत टाकून आच्छादन करावे.

4- खत व्यवस्थापन करताना लागवडीआधी मातीचे परीक्षण केलेले असेल तर उत्तमच असते. त्यामुळे जमिनीचा प्रकार व मातीतील खतांचे प्रमाण यावर आधारित खतांची मात्रा ठरवतांना सोपे जाते. त्यामुळे माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. शतावरीच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर पुरेपुर करणे गरजेचे आहे.

5- लागवड केल्यानंतर बुंध्याजवळील खड्ड्यातील माती खुरपून गड्डयाना भर द्यावी. रोपांना काठ्यांचा आधार द्यावा जेणेकरून त्यांची चांगली वाढ होते. हे शक्य झाले नाही तर तार किंवा दोरी बांधून आधार द्यावा.

नक्की वाचा:बटेर पालन ठरेल शेतीला भक्कम जोडधंदा,कायम वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगला व्यवसाय

 शतावरीची काढणी

1-लागवड केल्यापासून अठरा ते वीस महिन्यांनी शतावरीचे पीक काढणीला येते.

2- झुपक्याने वाढलेल्या मुळ्या खणून काढाव्यात व वेलीची खोडी तशीच ठेवावीत.

3- काढलेल्या मुळ्या स्वच्छ कराव्यात व मुळ्यांवरील बारीक साल काढून 10 ते 15 सेंटिमीटर लांबीचे तुकडे करावेत व मूळ यामधील शिर ओडून काढावी, म्हणजे मुळे वाढण्याची प्रक्रिया लवकर होते.

4- पांढरी शतावरी पासून प्रतिहेक्‍टर 10 ते 12 टन मुळ्या मिळतात.

5- पिवळ्या शतावरी पासून चार ते सहा टन प्रति हेक्‍टर मुळ्या मिळतात.

English Summary: shatavari cultivation process and medicianl benifit of shatavri Published on: 10 April 2022, 08:59 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters