1. कृषीपीडिया

सुक्ष्मजीव आणि फॉस्फरस यांचे घनिष्ठ नाते जाणून घ्या

जमिनीतील फॉस्फरस हा देखिल एक ऋण भार असलेला घटक आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सुक्ष्मजीव आणि फॉस्फरस यांचे घनिष्ठ नाते जाणून घ्या

सुक्ष्मजीव आणि फॉस्फरस यांचे घनिष्ठ नाते जाणून घ्या

जमिनीतील फॉस्फरस हा देखिल एक ऋण भार असलेला घटक आहे. ज्यामुळे विद्राव्य स्वरुपात असल्यानंतर फॉस्फोरस हा अल्प प्रमाणात का असेना पण जमिनीत खोलवर वाहुन जाण्याची शक्यता असते. फॉस्फरस हा सजिवांच्या शरीराचा, कार्बन आणि नायट्रोजन नंतरचा महत्वाचा घटक आहे. वनस्पती आणि ईतर सजिवांतील उर्जा निर्मितीत महत्वाची भूमिका फॉस्फरस पार पाडीत असतो. जमिनीत नैसर्गिकरित्या असलेला, तसेच वनस्पती आणि ईतर स्रोतांकड़न जैव स्वरुपात देखिल फॉस्फरस जमिनीत टाकला जातो. ह्या फॉस्फरस वर सुक्ष्मजीव प्रक्रिया करुन त्याचे रुपांतर पिकास उपलब्ध होईल अशा स्वरुपात करत असतात. फाॅस्फरस सायकल हि वातावरणात कमी प्रमाणात घडत असते, मात्र जमिनीतील एक एक महत्त्वाची क्रिया असते.

जमिनीत विविध स्वरुपात असलेला फॉस्फरस हा अत्यंत कमी प्रमाणात आणि सावकाश विरघळणारा असा पदार्थ आहे, ज्यामुळे त्याची पिकास उपलब्धता होण्यात अङचणी येतात. 

जास्त प्रमाणात विद्राव्य स्वरुपातील फॉस्फरस हा पाण्यात वाहुन जात असल्याने त्या बाबतीत देखिल पर्यावरणास हानिकारक असे परिेणाम जाणवत असतात. नियमित पणे फॉस्फरस विद्राव्य स्वरुपात रुपांतरीत करण्यासाठी सुक्ष्मजीवांचे महत्व अनन्य साधारण असे आहे.

निसर्गातील एका रुपातुन दुसऱ्या स्वरुपात रुपांतर होण्याच्या या क्रियेमध्ये सुक्ष्मजीव महत्वाची भुमिका पार पाडत असतात. तसेच ज्या स्वरुपात रासायनिक खते वापरली जातात, ती तशीच्या तशी काही पिक उचलून घेत नाही, त्यांचे रुपांतर पिकास शोषुन घेता येयील या स्वरुपात होण्यासाठी देखिल सुक्ष्मजीवच महत्वाचे ठरतात. ह्या व्यतिरिक्त जमिनीतील ईतर रासायनिक घटकांसोबत, आपण वापरत रासायनिक खते ही स्थिरीकरण होवुन पिकास उपलब्ध होणार नाहीत अशा स्वरुपात रुपांतरीत होत असतात, ज्यामुळे जमिनीतील रासायनिक संतुलन बिघडुन त्याचा विपरित परिणाम पिकाच्या वाढीवर आणि जमिनीच्या आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी जमिनीत सुक्ष्मजीवांची उपस्थिती ही गरजेची ठरते.

ज्यावेळेस पिकास खते दिली जातात, त्यातील काही भाग हा पाण्यात विरघवळणारा तर काही भाग हा अँसिड मध्ये विरघनळणारा असतो. सध्या उपलब्ध असलेली विद्राव्य खते हि पुर्णपणे विरघळणारी असतात. खतांचा जेवढा भाग पाण्यात विरघळतो, तेवढा भाग हा पिकासाठी उपलब्ध असतो, तसेच तो मातीत खोलवर वाहुन जाण्यासाठी देखिल उपलब्ध असतो.

आपण जाणतो की, धन आणि ऋणभार असलेल्या दोन अन्नद्रव्यांच्या अभिक्रियेतुन एखादा नवीन पदार्थ तयार होत असतो. मातीत आधीपासुन असलेल्या कार्बोनेटस, बायकार्बोनट, सल्फेट, क्लोराईड, मुक्त कॅल्शियम, चुना, मुक्त पोटॅश, मुक्त झिंक, मुक्त फेरस, मुक्त अँल्युमिनियन ह्यांच्या सोबत आपण वापरत असलेल्या विविध खतांतील अन्नघटकांची रासायनिक अभिक्रिया होत असते.

जसे मातीत स्फुरद युक्त कोणतेही खत वापरले तर ते मुक्त कॅल्शियम, अल्युमिनियम, फेरस यांचे सोबत स्थिर होत असते. 

मातीत आधीपासुन असलेल्या कार्बोनेट, बायकार्बोनेट सोबत झिंक, फेरस स्थिर होत असते. ह्या सर्व अभिक्रिया ह्या जशा एका दिशेने एखाद्या मुलद्रव्याला स्थिर स्वरुपात नेतात, तशाच त्या विरुध्द दिशेने घडल्यास त्या मुलद्रव्याला किंवाअन्नद्रव्याला पुन्हा उपलब्ध स्वरुपात देखिल घेवुन येतात. मुळांच्या व्दारा स्रवलेल्या हायड्रोजन आयन्समुळे, सुक्ष्मजीवांच्या व्दारा स्रवलेल्या सेंद्रिय आम्लांमुले, मुळांच्या व्दारा स्रवलेल्या सेंद्रिय आम्लांमुळे ह्या सर्व अभिक्रिया विरुध्द दिशेने नैसर्गिक रित्या होण्याची क्षमता निसर्गात आहे. मात्र ज्यावेळेस रासायनिक पदाथांचा जास्त वापर, गरजेची असलेली अन्नद्रव्ये न वापरता केवळ पिकाचाच विचार करुन वापरली जाणारी अन्नद्रव्ये, आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे मातीची बिघडेलेली भौतिक परिस्थिती ह्यांच्या संयुक्त परिणामांतुन पिकाच्या वाढीसाठी पोषक ठरणारी नैसर्गिक रचना बदलुन त्याची जागा हानीकारक परिस्थिती घेते. ह्या अशा परिस्थितीत, पाण्याचा मुरण्याचा वेग कमी होतो, मुळांची वाढ होत नाही, मातीत सारखे पाणी साचुन राहील्याने हानीकारक सुक्ष्मजीवांचीच संख्या वाढण्यास मदत मिळते. 

 

अधिक माहितीसाठी संपर्क-

एस व्ही अँग्रो सोल्यूशन्स् अधिकृत विक्रते

कृषक ऑरगँनिक्स्

पिंपळगाव बसवंत

9049322597.

English Summary: Learn about the close relationship between microorganisms and phosphorus Published on: 09 April 2022, 09:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters