जेव्हा आपण पिकाची लागवड करतो त्यावेळेस सगळ्यात प्रथम आपण संबंधित पिकांच्या जातीची निवड या गोष्टीकडे खूप लक्ष पुरवतो. कारण हे तेवढेच महत्त्वाचे असते.आपल्याला माहित आहेच कि,पिकाची व्हरायटीवर पुढचे हातात येणारे उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे कुठल्याही पिकाची लागवड करण्याआधी उत्तम पिकांच्या जातीची निवड करणे खूप महत्त्वाचे असते.
हीच बाब गव्हाच्या बाबतीत देखील लागू होते. गहू हे पीक रब्बी हंगामातील एक महत्त्वपूर्ण पीक असून महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड होते. या लेखात आपण गव्हाच्या एका महत्त्वपूर्ण जातीची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:Spinach Cultivation: पालक लागवड करून 20 दिवसांत करा 1 लाखांची कमाई; वापरा ही नवीन पद्धत
गव्हाची शरबती (306)व्हरायटी
शरबती गव्हाचा विचार केला या जातीच्या गव्हाचे दाण्यांमध्ये वेगळी चमक असते. त्याचे दाणे गोल चमकदार असतात. तसेच हा खाण्यास देखील खूप स्वादिष्ट आहे. या गाव्हामध्ये ग्लुकोज आणि सुक्रोज यासारख्या शर्कराचे प्रमाण जास्त असते.
या जातीची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच पंजाब व हरयाणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. मध्यप्रदेश राज्यातील सिहोर जिल्ह्यामध्ये या गव्हाचे उत्पादन सगळ्यात जास्त होते.
नक्की वाचा:Crop Cultivation: 'अशा'पद्धतीने करा शेवग्याची लागवड, मिळेल भरपूर उत्पादन आणि नफा
या गव्हाची वैशिष्ट्ये
1-शरबती गहू आकाराने गोल आणि चमकदार असतो तसेच त्याची चव अतिशय स्वादिष्ट असते.
2- या गव्हामध्ये पोटॅशचे प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे त्याचे दाणे घन आणि जड आहेत.
3-C 306 शरबती गव्हामध्ये ग्लूकोज, सुक्रोज यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते.
4- गव्हाचा हा सुधारित वाण इतर गव्हाच्या वानांच्या तुलनेमध्ये अनेक पटीने जास्त उत्पादन देणार आहे. तसे याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला इतर वाणांच्या तुलनेत अधिक बाजार भाव देखील मिळतो.
5- या वानाला साधारणपणे इतर गव्हाच्या तुलनेत 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो. या गव्हाची आवक कायमच कमी असते त्यामुळे बाजारात त्याला दर चांगले मिळतात.
Share your comments