शेतमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या अशा बातम्यांचा काळ आता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. शेतीमालाची उत्पादकता आणि बाजारमूल्यांची सांगड घालून नफा कमावण्याचे दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत, कारण शेतकरीच आता उद्योजक बनणार आहेत !शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने स्वत:च उद्योजक बनण्याचा मार्ग सापडलेला आहे, राज्यातील शेतकरी
गटांचे रूपांतर कंपन्यांमध्ये करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करण्यात येत आहेत.Farmer producer companies are being established for market oriented management. येत्या मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या अर्थसहाय्यातून स्मार्ट (SMART) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र अॅ्ग्रोबिझनेस अॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) (SMART) ही महत्त्वाकांक्षी
योजना सुरु करण्यात येणार आहे. २३०० कोटी रुपये खर्चाची ही योजना असेल, तिचा ७० टक्के आर्थिक भार जागतिक बँक तर ३० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे.काय आहे (स्मार्ट) (SMART) योजना?या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, प्राथमिक कृषी पतसंस्था, शासनाच्या व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आदींकडून स्थानिक पातळीवर प्रक्रिया केलेला कृषी माल बड्या कंपन्या खरेदी करणार आहेत. शेतमाल थेट गावातून विकला जावा, गावागावात शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, हा या योजनेमागचा उद्देश आहे.
या प्रकल्पाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे गरजेचे आहे.शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप आहे आणि हि कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सदस्य
असू शकतात आणि शेतकरी सदस्य स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये उत्पादक, खासकरून लहान आणि किरकोळ शेतक-यांचे संकलन समाविष्ट आहे जेणेकरुन शेतीतील अनेक आव्हाने एकत्रितपणे गुंतवून ठेवण्यासाठी एक प्रभावी गठबंधन तयार करणे, जसे की गुंतवणूक, तंत्रज्ञान, इनपुट आणि बाजारपेठेत सुधारित प्रवेश, शेती पिकांचे उत्पादन, कापणी, खरेदी, ग्रेडिंग, पूलिंग,
हाताळणी, विपणन, विक्री, सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे यासाठी अस्तित्वात येते.सामूहिकरीत्या शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, तसेच बाजार संपर्क व शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो.शेतकरी कंपनीमार्फत कृषीआधारित विविध व्यवसाय सुरू करण्यात येतात़ यातून मिळणारा नफा व लाभांश शेतकरी सभासदांना विभागून मिळू शकतो.
Plutus FPO Formation Service
Co No :8087953049,9623557744
Share your comments