डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आता तीळ लागवडीचे सुधारित तंत्र (Modified technology) विकसित केले आहे. या सुधारित तंत्रांचा वापर करून तुम्ही मोठ्या प्रमाणावर तिळाचे उत्पन्न व नफा (Profit) मिळवू शकता.
शेतकरी सहसा मोठ्या प्रमाणावर तिळाची लागवड करत नाहीत. अगदी घरगुती वापरासाठी शेतात थोड्या प्रमाणात तीळ लावला जातो. पण अकोला येथील उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने “एकेटी-101′ ही तिळाची जात प्रसारित केली आहे. या जातीचा तीळ उन्हाळी हंगामात 90-95 दिवसांत पक्व होतो. याच्या दाण्याचा रंग पांढरा (White) आहे.
तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्टरी आठ ते दहा क्विंटल मिळते. ज्या शेतकऱ्यांकडे ओली जमीन आहे त्यांच्या साठी ही शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.
अशी करा तिळाची शेती
तिळाच्या शेतीसाठी भुसभुशीत, सपाट आणि निचरा होणारी जमीन लागते. या शेतीसाठी जमीन तयार करताना प्रति हेक्टरी दहा टन कूजक्या शेणखताचा वापर करावा. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपून घ्यावी
व पेरणीसाठी प्रति हेक्टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे. पेरणी करताना बियाण्यात समप्रमाणात माती,शेणखत किंवा राख मिसळावी. ३० से.मी अंतरावर पेरणी केलेली असावी. तीळास पाणी (Water) देताना पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. दर १२ ते १५ दिवसांनी जमीन ओली करावी. या पिकात तण जास्त येऊ नये याची काळजी घ्यावी.
- तिळाचे पीक रोप अवस्थेत असताना पाने गुंडाळणाऱ्या/खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या नियंत्रणाकरिता 20 मि.लि. क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पीक फुलोऱ्यात असताना व पुढे परिपक्वतेपर्यंत पर्णगुच्छ या रोगाचा प्रादुर्भाव होऊ तुडतुड्या मार्फत होऊ शकतो. यासाठी 4 मि.लि. इमिडाक्लोप्रिड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- रोगट झाडे दिसल्यास उपटून टाकून द्यावी.
तिळाची अशी लागवड केल्यास हेक्टरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन मिळते. याशिवाय तीळामध्ये मुगाचे आंतरपीक सुद्धा घेता येते.
Share your comments