शिमला मिरची लागवडीसाठी सप्टेंबर महिना आहे बेस्ट

Tuesday, 02 June 2020 06:42 PM

 

भारतातील शेतकरी आता आधुनिक शेती करण्याकडे वळला आहे. पारंपरिक पिकांसोबत आधुनिक पीके घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या पिकांमध्ये शिमला/ढोबळी मिरची या पिकाचाही समावेश आहे. शहरी भागात या शिमला मिरचीला मोठी मागणी आहे. आज याच शिमला मिरचीच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. शिमला मिरचीची लागवड ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात करावी कारण या पिकाची वाढ होण्यास ऑगस्ट मधील वातावरण अनुकूल असते. या मिरचीच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीच्या जमिनीची निवड करावी.

सर्वप्रथम जमिनीची उभी व आडवी नांगरट करून घ्यावी. त्यानंतर यात साधारण पाच फुटांवर बेड तयार करून घ्यावेत. बेड तयार केल्यानंतर एका एकरमध्ये दोन टेलर शेणखत आणि रासायनिक खत मिसळून घ्यावे. खत मिसळल्यानंतर बेडवर मलचिंग पेपर टाकून घ्यावा. या पेपरवर प्रत्येकी एक फुटावर झिक झॅक पद्धतीने होल तयार करून घावेत. त्यानंतर एका एकरमध्ये जवळपास दहा हजार रोपांची लागवड करावी. यासाठी इंद्रा, वंडर, भारत या जातीच्या वाणांचा वापर करावा. लागवडीनंतर साधारणतः तीन दिवसांनी 22-3 या बुशीनाशकाची ड्रिंचींग घ्यावी. पुन्हा चार दिवसांनी 19-19 या रासायनिक खतांची ड्रिंचीन घ्यावी. तसेच रोपांना वेळोवेळी पाणी द्यावे.

रोपांच्या लागवडीनंतर साधारणतः एक महिन्यानंतर झाडाला आधार देण्याची गरज असते. त्यासाठी बांबू आणि तारांचा साह्याने स्टेजिंग तयार करावे. यासाठी तारेची उंची 6 फूट असावी. आवशकतेनुसार सुतुळीच्या साहाय्याने तारेला फांद्या बांधून घ्याव्यात. तसेच खतांचा डोस सुरू ठेवावा. त्यासाठी 19-19, 12-61,13-40-13, 0-52-34, 0-0-50, कॅल्शिअम नायत्रेट ही खते वापरावी. तसेच वेगवेगळ्या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. साधारणतः 60 दिवसांनंतर शिमला मिरचीचे उत्पादन सुरू होते. ते तुम्ही स्थानिक बाजारात किंवा मोठ्या शहरांत विकू शकता. अशा पद्धतीने उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसून येत आहे.

capsicum capsicum chilly plantation chilly plantation capsicum लागवड शिमला मिरची लागवड
English Summary: september month is best for capsicum chilly plantation

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.