कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये.
कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनात घट येते. ही घट कांद्यामध्ये जातीपरत्वे 25 ते 30 टक्के असते. कांदा काढणीनंतर तो चांगला सुकवला नाही तर वरचा पापुद्रा चांगला वाळत नाही.
वरचे कवच ओलसर राहिले तर कांदा सडतो. कांद्याची सड विशेषतः जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जास्त होते. सडीमुळे कांद्याचे या काळात 10 ते 15 टक्के नुकसान होते. कांदा काढणीसाठी तयार झाला असता त्याची मान मऊ होते आणि पात आडवी होते. या काळात पानातील ऍबसेसिक ऍसिड कांद्यामध्ये उतरते. हे रासायनिक द्रव्य कांद्याला एक प्रकारची सुप्त अवस्था प्राप्त करून देते. रब्बी कांद्याच्या माना व्यवस्थित पडतात. रब्बी कांदा काढणीनंतर लगेच कोंब न येता टिकतो; परंतु खरिपातील किंवा रांगड्या हंगामातील कांद्याच्या माना पडत नाहीत.
कांदा अनुदान मिळण्यास पीक नोंदणीचा अडसर, शेतकरी नाराज
साठवणीवर परिणाम करणारे घटकजातीची निवड
सर्वच जाती सारख्या प्रमाणात साठवणीत टिकत नाहीत. खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे 4 ते 5 महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे फरक पडतो.
काय सांगता! आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, जाणून घ्या..
खतांच्या मात्रा आणि खतांचा प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होत असतो. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते. जास्तीत जास्त शेणखताचा वापर किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 80 किलो पालाश आणि 50 किलो गंधकाची शिफारस केली आहे. शक्य होईल तितके नत्र सेंद्रिय खतांमधून द्यावे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळाचे कामकाज गतिमान करणे गरजेचे
विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी; सरपंचाने नोटांची उधळण करत केला राडा..
कांदा अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत, असा करा अर्ज..
Share your comments