एका वर्षात गॅस चे दर फक्त दोनशे रुपयाच्या वर वाढलेत,विजेचे दर फक्त हजारो रुपये वाढलेत,बस,रेल्वे चे भाडे फक्त दुप्पट वाढलेत,पेट्रोल,डिझेल चे भाव वाढ तर किरकोळ गोष्ट आहे त्यामुळे कुणाही इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या प्रतिनिधीला कुणीच बाई भेटली नाही की तीचे बजेट त्यामुळे बिघडले आणि हो देशासाठी तेव्हढे सहन केलेच पाहिजे .अगदी तशीच दरवाढ शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खतांची,,विजेचे दरांची,मजुरीचे किंवा डिझेल मुळे वाढलेली मजुरीचे सारे दर एका वर्षात तेवढीच फक्त दुप्पट केली ,त्या बदल्यात त्यांना दोन ते चार टक्के दर वाढवून मिळतील अशी सोय केली ,म्हणजे या वर्षीचा तोटा फक्त दुप्पट होतो आहे तरी ते देशद्रोही शेतकरी तेव्हढे देखील सहन करू शकत नाहीत.
त्यांचा कांदा आमची जनता खाते तरी किती? प्रती कुटुंब महिन्याला तीन किलो, त्यांना दहा रुपये दरवाढ दिली तर तब्बल तीस रुपये कुटुंबाचा खर्च वाढेल व महिन्याला तीन किलो लागणाऱ्या साखरेच्या दरात सात रुपये वाढ दिली तर महिन्याला वीस रुपये असे एकूण तब्बल पन्नास रुपये महिन्याला वाढ दिली तर आमच्या गृहिणीचे बजेट चुकेल,आमच्या मिडीयाला पुन्हा महागाईचा भडका दाखवण्यासाठी रस्त्यावर यावे लागेल. त्यासाठी त्यांना दिला जाणारा भाव अजून कमी केला पाहिजे असे आमचे मत आहे.आणि हो अन्नसुरक्षा अंतर्गत प्रत्येक गावाला पुन्हा धान्य पाठवावेच लागते त्यामुळे ते धान्य शेतकऱ्यांकडून घेवून जिल्ह्याला,ह्या राज्यातून त्या राज्यात पाठवणे सरकारला खरच महाग जात आहे,त्या पेक्षा त्याच्या शेतातून शेतमाल निघाला की तेथल्या तेथे त्याचे कुटुंबासाठी लागणारा थोडा फार काढून देवून,उरलेला ताब्यात घेतला व त्याच भागात
वाटला तर कितीतरी हमाली,डिझेल चा खर्च वाचेल व सरकारला अनावश्यक करावा लागणारा खर्च करावा लागणार नाही.शेतकऱ्याच्या जन्मात आल्याचे पाप फेडण्याचा व पुण्य कमवण्याचा हा मार्ग आहे. त्यामुळे त्यांचे पुन्हा जन्म मरण चे फेऱ्यातून पुन्हा नवीन घेण्याचे चक्र कायमचे बंद होईल.आपले देशात गेल्या पन्नास वर्षात जी जी सरकारे आली ती खूप प्रेमळ,दयाळू आलीत कुणी सबसिडी दिली,आता तर त्या देशद्रोही शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मायबाप सरकार देत,त्याचे त्यांना काहीच सोयर सुतक नाही,त्यांना त्यांच्या शेतमालाचा काहीना काही भाव व्यापारी देतो.एव्हढे सज्जन देशातील जनतेचे भले पाहणारे लोक भेटल्यावर देखील त्यांना गरिबांना फुकट अन्नधान्याची सोय साठी किंवा पस्तीस रुपये साखर वाटपासाठी,दहा रुपये किलोने कांद्यासाठी मदत करीत नसतील तर निश्चित ते शेतकरी देशद्रोही
आहेत.फक्त यांच्या हट्टापायी कांद्याला भाव दिल्याने श्रीमती शीला दीक्षित यांना आपले सरकार सोडावे लागले होते,पुन्हा कोणत्या सरकारचा बळी देणे आता शक्य नाही.ह्या शेतकऱ्यांना कुणी तरी समजवा की पुण्य प्राप्तीसाठी कुणी पाणपोई लावतो,कुणी अन्नछत्र उघडतो आणि आपण आपला शेतमाल देत नसणार तर तो देशद्रोह च आहे.तात्पर्य:- लोकशाहीत गेल्या पन्नास वर्षात सारे तत्वज्ञान फक्त शेतकऱ्यांना सांगितले जाते,कोणताही राजकारणी खरोखर त्याचा विचार करीत नाही,कारण पन्नास वर्षात सारे आलटून पालटून सत्तेत आले,सत्तेतून पायउतार झाले की साऱ्यांचे शेतकरी प्रेम उतू येते.आम्ही कुणाशीही कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करायला तयार आहोत.या देशात फक्त आणि फक्त शेतकरी वर्गास वेठबिगार म्हणून वागवले जात आहे.तरी कुणाला त्याची दया येत नाही,त्यामुळे वरील विडंबनात्मक लिखाण...अर्थात पटल तर घ्या नाहीतर आमचे आम्हाला परत.
Share your comments