1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांना मालामाल बनवेल 'ही' औषधी वनस्पती, एका एकरात 4 लाख रुपयांपर्यंत कमाईची संधी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
sarpgandha cultivation

sarpgandha cultivation

 शेतकरी आता पारंपारिक पिकांच्या शेतीतून नवीन मार्ग स्वीकारत असल्याचं समोर आलं आहे. काही शेतकरी आता औषधी पिकांची लागवड करत आहेत. कमी उत्पादन खर्च आणि मोठी मागणी यामुळे शेतकरी चांगली आर्थिक कमाई करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार औषधी पिकांची शेती फायदेशीर ठरत आहेत. शेतकऱ्यांसमोर सर्पगंधाची शेती करण्याची चांगली संधी आहे. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात येते. शेती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार सर्पगंधाची शेती भारतात 400 वर्षांपासून करण्यात येत आहे.(Sarpgandha farming better source of income for farmers in India medicinal plant snakeroot)

सर्पगंधाची शेती कशी करतात?

सर्पगंधाची शेती तीन प्रकारे केली जाते. सर्पगंधाची कलम बनवून ती 30 पीपीएमच्या एन्डोल अॅसिटिक अॅसिडमध्ये 12 तासांपर्यत बुडूवन ठेवली जातात. यानंतर ती लावली जातात. दुसऱ्या पद्धतीत सर्पगंधांच्या मुळं लावली जातात. मुळं माती भरलेल्या पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये ठेवली जाता. सर्पगंधाची मूळं एक महिन्यानंतर अंकुरित होतात. तिसऱ्या पद्धतीत बियांची पेरणी केली जाते. सर्पगंधाच्या बियांची पेरणी करणं ही सर्वात चांगली पद्धत मानली जाते.

. यासाठी सरपगंधा च्या चांगल्या बियाण्यांची  निवड करणे आवश्यक आहे. नर्सरीमध्ये रूपाला जेव्हा चार ते सहा पाने येतात त्यावेळी त्याची शेतीत लागवड केली जाते. एकदाका सर्पगंधा ची लागवड केली तर कमीत कमी दोन वर्षापर्यंत औषधी वनस्पती शेतात राहते.

       सर्पगंधा ला फूल आल्यानंतर फळ आणि बिया तयार होण्यासाठी सोडलं होतं. आठवड्यात दोन वेळा तयार झालेल्या बियांची निवड केली जाते.

ही प्रक्रिया जवळजवळ रूप काढण्यापर्यंत सुरू राहते. सर्पगंधाची पानझड झडल्या नंतर ती मुळापासून काढून टाकले जातात. त्यानंतर ती वाळावली जातात. शेतकरी ज्या वेळी याची विक्री करतात त्या वेळी मोठी कमी होते.

 सौजन्य -tv9 मराठी

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters